मुंबई : अधिवेशनापूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी सांगितलं आहे. सरकारमध्ये सामील होण्याची कोणतीही घाई नसल्याचं यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे, हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्यात येईल असं शिवसेना नेते अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
शिवसैनिक तसेच काही नेत्यांमध्ये सरकारमध्ये सामील होण्याविषयी वेगवेगळी मतं दिसून आली आहेत. मात्र शिवसैनिकांनी सरकारमध्ये सामील होऊ नये असंच म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला उद्धव ठाकरे यांना भाजप नेते अरूण जेटली तसेच अमित शहा यांनी फोनवरून उपस्थित राहण्याची विनंती केली होती. अखेर उद्धव ठाकरे शपथविधी समारंभाला हजर राहिले, पण यामुळे शिवसेना आणि भाजपमधील मतभेद दूर झाले आहेत का हे अजून तरी दिसून आलेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.