मुंबईच्या लोखंडवाला परिसरात एका फ्लॅटमध्ये डान्सबार

मुंबईतल्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरातल्या एव्हर शाईन क्लासिक टॉवरच्या एका फ्लॅटमध्ये चक्क डान्स बार थाटून बसलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Dec 14, 2015, 04:28 PM IST
मुंबईच्या लोखंडवाला परिसरात एका फ्लॅटमध्ये डान्सबार  title=

मुंबई : मुंबईतल्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरातल्या एव्हर शाईन क्लासिक टॉवरच्या एका फ्लॅटमध्ये चक्क डान्स बार थाटून बसलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केलीय.

इमारतीतल्या फ्लॅट नंबर 201मधून या सहा जणांव्यतिरिक्त 6 मुलींनाही पकडण्यात आलंय. रहिवासी भागात एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या याप्रकारामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीचं वातावरण आहे.  

याप्रकरणी फ्लॅटच्या मालकालाही अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे यातले बहुतांश लोक सरकारी अधिकारी आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.