अवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे निलंबित

नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांना निलंबन करण्यात आले आहे. लहाडेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2017, 08:11 PM IST
अवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे निलंबित

मुंबई : नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांना निलंबन करण्यात आले आहे. लहाडेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 

तसेच लहाडेचे वैद्यकीय नोंदणी रद्द करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. 

माजी न्यायमूर्ती आणि माजी आरोग्यसंचालकांच्या अध्यक्षतेखाली अवैधरीत्या गर्भपात प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. झी 24 तासनं सतत या बातमीचा पाठपुरावा केला होता. त्याच वृत्ताची सरकारनं दखल घेतली आहे.