सरकार 'वाजवा रे वाजवा' वरून 'वाचवा रे वाचवा'वर

फडणवीस सरकारमध्ये गोत्यात आलेल्या सर्व मंत्र्यांना आता 'वाचवा रे वाचवा' असं म्हणून क्लिनचीट देण्यात येत आहे. 

Updated: Jul 19, 2016, 11:03 AM IST
सरकार 'वाजवा रे वाजवा' वरून 'वाचवा रे वाचवा'वर title=

मुंबई : फडणवीस सरकारमध्ये गोत्यात आलेल्या सर्व मंत्र्यांना आता 'वाचवा रे वाचवा' असं म्हणून क्लिनचीट देण्यात येत आहे. एक तर हे मंत्री गोत्यात आपआपसातील सुंदोपसुंदीमुळे अडचणीत आले हे आता लपून राहिलेलं नाही.

एकनाथ खडसे यांना दाऊद संभाषण प्रकरणी क्लिनचीट मिळाली आहे, दुसरीकडे गिरीश महाजन यांची जमीन प्रकरणात सारवासारव करून झालीय. घरपोच पोषण आहारात आता पंकजा मुंडे यांच्या मदतीला जवळ-जवळ अख्ख मंत्रिमंडळ उभं राहिलंय.

पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्या मदतीला यापूर्वीही मंत्रिमहोदय असेच धावून आले असते तर?

आपआपसातील हेवेदावे वाढल्याने महत्वाचे मंत्री अडचणीत येत आहेत, हे  उशीरा लक्षात आल्यानंतर सुरूवातीला 'वाजवा रे वाजवा' करणारे सरकार, आता 'वाचवा रे वाचवा'च्या मुडमध्ये आल्याचं दिसतंय.

एकंदरीत फडणवीस सरकारचा मूड बदललाय, त्यामुळे आतील आणि बाहेर फेकल्या गेलेल्या मंत्र्यांना सुखाचे दिवस येणार आहेत.