हुश्श... झालं एकदाचं 31st...

मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क होते. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

Updated: Jan 1, 2012, 04:10 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क होते. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी जुहूमध्ये जे डब्ल्यू मॅरिएट बाहेर झालेल्या छेडछाडीची घटना आजही लक्षात आहे. त्यामुळे या ठिकाणी हॉटेलबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली होती.

 

नाक्यानाक्यावर पोलीस पहारा होता. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेली दारुची दुकानं पोलिसांनी बंद केली. तसंच दिलेल्या वेळेत हॉटेल्स बंद केली जाताहेत की नाही यावरही पोलिसांची बारीक नजर होती. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांनाही पोलिसांनी वेळीच आवरलं.

 

जुहूमध्ये अशाप्रकारे धिंगाणा घालणा-याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरातल्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारीदेखील सक्रीय होते. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही पोलिसांचा चांगला वचक असल्याचं जाणवत होतं. वाहनचालकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी अनेक अभियानही चालवले होते. त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नसला तरी पोलिसांच्या प्रयत्नांचं नागरिकांकडून कौतुक होतं आहे.