किडनी तस्करीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

किडनी तस्करी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा केल्या जाईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय. 

Updated: Dec 5, 2015, 11:57 PM IST
किडनी तस्करीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल title=

औरंगाबाद : किडनी तस्करी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा केल्या जाईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा : किडनी रॅकेट - तीन डॉक्टरांची चौकशी, मुख्य सूत्रधार फरारी

या प्रकरणाचा अहवाल मागवून त्यावर चर्चा केल्या जाणार असून भाजपचा कुठलाही कार्यकर्ता या प्रकरणात असल्यास त्याला पाठीशी घातल्या जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल असही पाटील यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा : अकोला किडनी रॅकेट, औरंगाबादेतून दोन डॉक्टर ताब्यात

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्तालयात रस्त्यांच्या कामासंदर्भातील आढावा घेण्यात आला.या बैठकीनंतर ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.