राणेंच्या प्रवेशावर रावसाहेब दानवेंचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते नारायण राणे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेटायला गेले की नाही याची आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2017, 08:29 AM IST
राणेंच्या प्रवेशावर रावसाहेब दानवेंचे स्पष्टीकरण title=

लातूर : काँग्रेस नेते नारायण राणे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेटायला गेले की नाही याची आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

नारायण राणे भाजप प्रवेशावर आतापर्यंत कसलीही चर्चा झाली नसली तरी भविष्यात काहीही घटना घडू शकतात, असे उत्तर देत राणेंच्या प्रवेशाचे संकेतच दानवे यांनी दिले आहेत.

भजपमध्येणाऱ्यांसाठी काही सूत्रं आहेत. त्या सूत्रात जर येणारा व्यक्ती बसत असला तरच आपण पक्षात घेत असतो असा खुलासा ही रावसाहेब दानवे यांनी केला. ते लातूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.