जळगाव : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्र पक्षांची युती तुटली कशी? हा प्रश्न सर्वांनाच पडत होता, मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं आहे.
यावर जळगावातील एका कार्यक्रमात बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले, भाजपच एकट्याच्या बळावर सत्ता येईल का?, असं नरेंद्र मोदी यांनी आपल्याला विचारलं होतं.
यावर आपण "भाजपच्या एकट्याच्या बळावर सत्ता येऊ शकते", असं मोदींना सांगितलं, त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले होते, "तसं असेल तर युती तोडून टाका ".
अखेर भाजपशी युती तोडण्याची घोषणा करण्याची जबाबदारी मी घेतली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
आपण युती तोडण्याची घोषणा का केली, यावर खडसे म्हणतात, कारण प्रत्येक जण हे शिवसेनेला फोन करून सांगण्यास नकार देत होता, असा गौप्यस्फोट भाजपा नेते, तसेच राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय .
दिल्लीतील बैठकीत अमित शाह ,नितिन गडकरी ,देवेन्द्र फडणवीस खुद्द मोदी होते, मात्र युती तुटल्याची घोषणा करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते, ती हिंमत मी दाखवली आणि युती तोडली, असं खडसे यांनी सांगितलंय. तसेच सत्तेसाठी पुन्हा शिवसेनेशी पुर्नविवाह केला, अलायन्स तुटतात बनतात असंही खडसे म्हणतात.
महसूल मंत्रीएकनाथ खडसे यांची मुलगी जिल्हा बँकच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचा सत्कार जळगावात करण्यात आला, त्यावेळी खडसे यांनी हा गौप्यस्फोट केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.