नागपूर : औरंगाबादच्या नामांतराला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी जोरदार विरोध केलाय. औरंगाबादचे नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण आहे. नाव बदलणा-यांनी औरंगाबादमधल्या लोकांना एक एक पेला पाणी द्यावं, असा टोला नेमाडेंनी लगावलाय.
अधिक वाचा : औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर बदलणार : उद्धव ठाकरे
कोणत्याही शहराच्या नावात इतिहास असतो. आपण इतिहास बदलू नये असा सल्ला त्यांनी दिलाय. तर विचार मांडणं म्हणजे दहशतवाद आहे का असा सवाल त्यांनी विश्वास पाटील यांना केलाय. नेमाडे साहित्यातले दहशतवादी असल्याची टीका विश्वास पाटलांनी केली होती.
अधिक वाचा : दिल्लीतील या रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव
दरम्यान, दिल्लीतील औरंगाबाद रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याबाबत आपली भूमिका मांडली. या भूमिकेला नेमाडे यांनी विरोध दर्शविला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.