मुंबई : भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे भाजपने शिवसेनेला कोणतंही उत्तर दिलं नसल्याने शिवसेनेतील अस्वस्थता वाढलीय.
शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत येऊन सरकार बनवण्याची समीकरणं चाचपळली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहेत. राष्ट्रवादीसोबत सरकार बनवून काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेण्यासंदर्भात शिवसेनेत हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची ही खेळी असल्याचंही सांगण्यात येत आहे. भाजपने शिवसेनेला कोणतंही उत्तर दिलेलं नाही, म्हणून शिवसेनेने हा दबावगट तयार केला आहे का?, हा प्रश्न देखिल समोर येत आहे.
शिवसैनिकांनी या आधीच भाजपसमोर जाण्यास असमर्थता दर्शवली होती, शिवसेनेला मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा मोठं यश मिळालं आहे, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत देखिल विदर्भात शिवसेनेला चांगलं यश मिळालं होतं, यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताही शिवसेनेने कायम राखली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.