प्याल दारू तर चौखूर उधळेल वारू

ब्रिटनमधल्या अल्पवयीन युवक आणि युवतींमधे दारू पिण्याच्या सवयींमुळे त्यांच्यात सेक्सचा आनंद घेण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे जोखीम वाढते असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

Updated: Jan 6, 2012, 12:54 PM IST

www.24taas.com वेब टीम, मुंबई

 

 ब्रिटनमधल्या अल्पवयीन युवक आणि युवतींमधे दारू पिण्याच्या  सवयींमुळे त्यांच्यात सेक्सचा आनंद घेण्याची इच्छा निर्माण होते.   त्यामुळे जोखीम वाढते असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

 

एकदा दारूचे अतिरिक्त सेवन केल्यानंतर सेक्सचा आनंद  घेतात आणि त्यामुळे अल्पवयात गर्भधारणा आणि संसर्गाचा  प्रार्दुभावाचा धोका अधिक वाढतो, रॉयल कॉलेज  ऑफ फिजिशियन्स यांच्या म्हणण्यानुसार अनेक युवकांनी हे कबूल  आहे. 

 

या संदर्भात एक अहवाल डेली मेल या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला आहे.  गर्भनिरोधक गोळ्या किंवा साधनांसाठी युवक किंवा युवतींनी संपर्क साधल्यास त्यांना त्यांच्या दारू पिण्याच्या सवयींबद्दल विचारणा करावी, असे आवाहन संशोधकांनी डॉक्टर आणि परिचारिकांना आवाहन केलं  होतं.  

 

ब्रिटनमध्ये मोफत गर्भनिरोधक साधनं, गोळ्या तसंच चाचणी आणि उपाचारांसाठी  एक दशलक्ष अल्पवयीन युवक आणि युवतींनी आरोग्य केंद्रांना भेट दिल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे. एका संशोधनाअंती हे समोर आलं आहे की, १४-१५ वयोगटातील मुलींना दारु प्यायल्यानंतर सेक्स करण्याची इच्छा अधिक प्रमाणात उत्पन्न झाली. तर १६ ते ३० वयोगटातील ८० टक्के मुलींनी सेक्स करण्याअगोदर दारुचे सेवन केलं होतं. दारु प्यायल्यामुळे मनाचा तोल ढळतो आणि त्यामुळे सेक्सची तीव्र इच्छा उत्पन्न होते, त्यामुळे आता तरुण पिढीला याबाबतीत सावधनतेचा इशारा देण्यात येत आहे.