अभिनेत्री परिणीतीचा नवा अवतार

अभिनेती परिणीती चोप्रा आता अभिनयाबरोबरच गायिकाही होणार आहे. पहिल्यांदाच परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अक्षय रॉय दिग्दर्शित मेरी प्यारी बिंदू या सिनेमात परिणीती आणि आयुषमान दोघेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Updated: May 27, 2016, 03:40 PM IST

मुंबई : अभिनेती परिणीती चोप्रा आता अभिनयाबरोबरच गायिकाही होणार आहे. पहिल्यांदाच परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अक्षय रॉय दिग्दर्शित मेरी प्यारी बिंदू या सिनेमात परिणीती आणि आयुषमान दोघेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

परिणीती चोप्राने नुकतीच तिने गायलेल्या गाण्याची एक झलक व्हिडीओव्दारे अपलोड केलीये. परिणीतीचे गाणं ऐकून कोणालाही आश्चर्यच वाटेल. कोणतेही गाण्याचे प्रशिक्षण नसूनही परिणीतीने खूप सुंदर गायले आहे. पूर्ण गाणे आता कधी रिलीज होईल याचीच तिच्या चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

अक्षय रॉय यांची ही पहिलीच फिल्म आहे. या फिल्मचे शूटिंग कोलकात्यामध्ये झाले आहे. परिणीती आणि आयुषमानने कोलकात्यात शूटिंग दरम्यान केलेल्या मस्तीची ही काही दृष्ये.

 

Bindu and Abhimanyu's joyride in the City of Joy! Hahaha #MeriPyaariBindu @ayushmannk

A photo posted by Parineeti Chopra (@parineetichopra) on