मुंबई: फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडलाही सैराट चित्रपटानं याडं लावलं आहे. बॉलीवूड अभिनेता इरफान खानला सैराट चित्रपट प्रचंड आवडला आहे. इरफान सैराटच्या एवढा प्रेमात पडला आहे, की त्यानं आता सैराटचं एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं आहे.
सैराटचं हे स्पेशल स्क्रिनिंग लहान मुलांसाठी असणार आहे, या स्क्रीनिंगला इरफानची मुलंदेखील जाणार आहेत. सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेही या स्क्रिनिंगला हजेरी लावणार आहे.
मराठी रोमिओ-जुलिएटची कहाणी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, तरुणपिढीनं हा चित्रपट पाहावा, असं इरफान म्हणाला आहे. तसंच भारतीय सिनेमा जागतिक पातळीवर घेऊन जायची ताकद सैराटमध्ये आहे, असं तोंडभरून कौतुक इरफाननं केलं आहे.