लाहोर : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक किस्सा सांगितला आहे, सोनिया गांधी यांनी गंमतीत खुर्शीद कसुरी यांना उत्तर दिलं होतं की, आपण राजीव गांधी यांच्याशी यांच्यासाठी लग्न केलं, कारण राजीव एक 'सुंदर युवक' आहेत.
खुर्शीद कसुरी यांनी आपलं पुस्तक ‘नीदर अ हॉक नॉर अ डव’मध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या, २००५ मधील चर्चेचा उल्लेख केला आहे. कसुरी यांनी २००५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुखर्रफ यांच्या भारत दौऱ्यातील सुंदर चर्चेचा उल्लेख केला आहे.
सोनिया गांधी यांची मुशर्ऱफ भारताच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांच्यासोबत चर्चा होणार होती, या चर्चेला सोनिया आल्या तेव्हा त्या गंभीर दिसत होत्या, सोनिया यांच्यासोबत त्यावेळचे परराष्ट्र मंत्री नटवरसिंह देखील होते.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावरील बैठकीतला हा गंभीरपणा घालवायचा होता, म्हणून त्यांनी सोनियांना सांगितलं, "मी जेव्हा केंब्रिजमध्ये होतो, तेव्हा सोहेल इफ्तिखारसोबत ( जे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंचे मित्र आणि काँग्रेसचे प्रसिद्ध नेते मियाँ इफ्तिखारउद्दीन यांचे चिरंजीव होते) सहज फिरत होतो, तेव्हा रस्त्याच्या विरूद्ध बाजूला एक सुंदर युवक मला येतांना दिसला, तेव्हा मी विचारलं हा सुंदर मुलगा कोण आहे?, तेव्हा मला उत्तर देण्यात आलं, तो जवाहरलाल नेहरूंचा नातू आहे."
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जेव्हा राजीव गांधी यांचा सुंदर असा उल्लेख केला, तेव्हा लगेच सोनिया गांधी यांनी उत्तर दिलं, "म्हणून तर मी राजीव यांच्याशी लग्न केलंय".
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.