बाबरी मशिद पाडल्याप्रकरणात नेत्यांच्या सहभागाबाबत आज फैसला

बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा सर्वोच्च न्यायालय आज फैसला करणार आहे. आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत, अशी विनंती सीबीआयने या आधीच केली होती. 

Updated: Mar 23, 2017, 08:28 AM IST
बाबरी मशिद पाडल्याप्रकरणात नेत्यांच्या सहभागाबाबत आज फैसला

नवी दिल्ली : बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा सर्वोच्च न्यायालय आज फैसला करणार आहे. आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत, अशी विनंती सीबीआयने या आधीच केली होती. 

दरम्यान या प्रकरणी आज खंडपीठ सुनावणी करेल असा खुलासा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या १३ नेत्यांवर बाबरी मशीद प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल आहे. या १३ जणांची नावं सीबीआयनं अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयानं ती नावं काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज निर्णय दिला जाईल.