www.24taas.com , झी मीडिया, जोधपूर
आसाराम बापू यांच्याकडून आपल्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. या घटनेबद्दल घरी सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला उद्धस्त करण्याची धमकी बापूंनी दिल्याचं ते म्हणाले. शिवाय त्यांच्या शिष्यांकडून केस मागे घेण्याबाबत आपल्यावर दबाव येत असल्याचंही पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. आसाराम बापूंना अजूनपर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले संत आसाराम बापू यांना ‘लुकआऊट’ नोटीस जारी करण्याची लेखी मागणी जोधपूर पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडे केलीय. ही मागणी मंजूर झाल्यास आसाराम यांना देश सोडून अन्यत्र जाता येणार नाही. पोलिसांनी आज आठ तासांच्या प्रतिक्षेनंतर इंदूरच्या आश्रमात चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होण्याचं समन्स बापूंना बजावलंय.
आसाराम बापू यांच्यावरील आरोपांची शहानिशा होईपर्यंत त्यांना देश सोडून बाहेर जाता येऊ नये यासाठी ‘लुकआऊट नोटीस’ जारी करावी असं निवेदन जोधपूर पोलिसांनी दिल्लीच्या सह इमिगे्रशन संचालकांना पाठविलंय. आसाराम यांनी ३० ऑगस्टला चौकशीसाठी जोधपूर पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.