खुशखबर! आता ट्रेनमधील जेवणावर सीसीटीव्हीचा वॉच

ट्रेनमध्ये एसएमएसनं जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा देशातील काही निवडक रेल्वे स्थानकांवर २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं ट्रेनमधील खानपान सुविधेवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा विचार सुरू केला आहे. 

Updated: Sep 22, 2014, 09:52 AM IST
खुशखबर! आता ट्रेनमधील जेवणावर सीसीटीव्हीचा वॉच

नवी दिल्ली: ट्रेनमध्ये एसएमएसनं जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा देशातील काही निवडक रेल्वे स्थानकांवर २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं ट्रेनमधील खानपान सुविधेवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा विचार सुरू केला आहे. 

रेल्वेच्या पॅण्ट्री कारमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाचे महासंचालक अनिक सक्सेना यांनी याबाबतची माहिती दिली. एका महिन्यात लांब पल्ल्याच्या सर्वच रेल्वेंमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था केली जाणार आहे, असंही ते म्हणाले. 

रेल्वेमधील खाण्यापिण्याचा दर्जा वाढविण्यासाठी खाण्याच्या पदार्थांच्या पाकिटावर किमतीजवळच तक्रार करण्यासाठी एक दहा अंकी नंबर देण्यात आला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.