Ind vs Pak: विराटला शतकापासून रोखण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये कट? हादरवणारा दावा

Champions Trophy 2025 Virat Kohli Century: विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपलं चौथं शतक झळकावलं. मात्र आता या सामन्यानंतर एक धक्कादायक दावा केला जातोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 24, 2025, 10:52 AM IST
Ind vs Pak: विराटला शतकापासून रोखण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये कट? हादरवणारा दावा
सामन्यानंतर सोशल मीडियावर चर्चा

Champions Trophy 2025 Virat Kohli Century: भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या रविवारी झालेल्या सामन्यात धूळ चारली. सहा विकेट्स राखून भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला भारतीय फलंदाजीचा मधळ्या फळीतील आघाडीचा फलंदाज विराट कोहली. विराटने या सामन्याचा शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत आपलं एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वं शतक झळकावत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारतीय संघाच्या या विजयामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पुढच्या फेरीत स्थान निश्चित केलं आहे. मात्र या सामन्यामध्ये एक क्षण आला होता जेव्हा भारत जिंकेल पण विराटचं शतक होणार नाही असं वाटू लागलेलं. विशेष म्हणजे काही चाहत्यांनी तर विराटचं शतक होऊ नये म्हणून भारतीय संघाकडूनच प्रयत्न झाल्याचा दावा काही चाहत्यांनी केला आहे.

विराट शतकाजवळ पोहोचला अन्...

भारतीय संघासमोर 242 धावांचं लक्ष्य होतं. भारतीय संघाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने संयमी सुरुवात केली. भारताचा स्कोअर 100 वर असताना गिलही बाद झाला. गिलनंतर मधल्या फळीतील श्रेयस अय्यर मैदानात आला. त्यानेही उत्तम फटकेबाजी केली. 67 चेंडूंमध्ये त्याने 56 धावा केल्या. पाच चौकार आणि 1 षटकार श्रेयसने लगावला. भारताची धावसंख्या 214 वर असताना श्रेयस अय्यर 39 व्या ओव्हरला बाद झाला. भारताला विजयासाठी 28 धावा हव्या होत्या. तर विराटला शतक झळकावण्यासाठी 15 धावा हव्या होत्या. मैदानात आल्यानंतर हार्दिकने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक धाव काढली आणि पुन्हा तो फलंदाजीला आला. 

हार्दिक आला अन् धडधड वाढली...

40 व्या ओव्हरमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर पहिल्याच बॉलवर हार्दिकने चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा पळून काढल्या. त्यानंतर पुन्हा तो एक धाव पळाला. हार्दिकचा आक्रमकपणा पाहता तो आला सामाना संपवतोच की काय असं वाटू लागलं. कॉमेंट्री बॉक्समधूनही हार्दिकची फलंदाजी पाहता संघाच्या हिताला प्राधान्य देण्याचा संदेश घेऊनच हार्दिक मैदानात उतरल्याचं म्हटलं गेलं. मात्र या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 8 धावांवर हार्दिक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. 

नक्की पाहा >> Video: विराटने विजयी चौकार लगावत शतक झळावल्यानंतर पाकिस्तानी तरुणींनी काय केलं पाहाच

हार्दिक बाद झाल्यानंतर...

हार्दिक बाद झाला तेव्हा भारताला जिंकायला 19 धावा हव्या होत्या. तर विराटला शतकासाठी 14 धाव्या होत्या. त्यानंतर सामना संपायच्या आधी 42 व्या ओव्हरमध्ये वाईड बॉलच्या माध्यमातून एकूण 4 अतिरिक्त धावा दिल्या. तसेच मध्ये मध्ये अक्षर पटेलनेही एकेरी धावा घेतल्याने 42 ओव्हरनंतर भारताला विजयासाठी 4 तर विराटला शतकासाठी 5 धावा हव्या होत्या. यापैकी दोन धावा अक्षरने काढल्या. अखेर 43 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर चौकार लगावत आपलं शतक आणि भारताचा विजय साकारला. मात्र या साऱ्या गोंधळात हार्दिककडून वेगाने धावा करण्याचा जो प्रयत्न झाला तो पाहून अनेकांनी विराटचं शकत होऊ नये म्हणूनच हार्दिकला पाठवलं होतं असं म्हटलं.

नक्की वाचा >> ...तर विराट 41 वरच Out झाला असता! कोहलीची 'ती' कृती पाहून गावस्कर संतापून म्हटले, 'पाकिस्तानने..'

यामध्ये अगदी प्रशिक्षक गौतम गंभीरही ड्रेसिंग रुममधील या कथित कटात सहभागी असल्याचा दावा काहींनी केला. तशा पोस्टही व्हायरल झाल्या. अशाच काही पोस्ट पाहूयात...

1) संघातूनच कट?

2) एकदम मूडमध्ये होता

3) हार्दिकची प्रतिक्रिया

4) गंभीरची प्रतिक्रिया

5) ...म्हणून हार्दिकला केलं प्रमोट

अनेकांनी दावे खोडून काढले

मात्र, हे केवळ दावे खोटे असल्याचं बहुतांशी चाहत्यांचं म्हणणं आहे. भारताच्या विजयानंतर गंभीर आणि हार्दिक सेलिब्रेट करत असल्याचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले. हार्दिकने यापूर्वी एका आयपीएल सामन्यामध्ये असाच प्रकार केला असल्याची आठवण अनेकांना झाली.