एशिया-पॅसिफिकच्या शक्तिशाली यादीत आठ भारतीय महिला

भारताच्या शिरपेचार महिलांनी मानाचा तुरा खोवला आहे. देशाची मान जगात अभिमानाने उंचविण्याची कामगिरी ८ महिलांनी केली आहे. एशिया-पॅसिफिकच्या शक्तिशाली फॉर्च्युन यादीत या महिलांनी स्थान मिळविले आहे.

Updated: Sep 22, 2014, 09:25 AM IST
एशिया-पॅसिफिकच्या शक्तिशाली यादीत आठ भारतीय महिला title=

नवी दिल्ली : भारताच्या शिरपेचार महिलांनी मानाचा तुरा खोवला आहे. देशाची मान जगात अभिमानाने उंचविण्याची कामगिरी ८ महिलांनी केली आहे. एशिया-पॅसिफिकच्या शक्तिशाली फॉर्च्युन यादीत या महिलांनी स्थान मिळविले आहे.

एशिया-पॅसिफिकच्या २५ शक्तिशाली फॉर्च्युन यादीत आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांच्यासहित ८ भारतीय महिलांनी आपले नाव कोरले आहे. या यादीत कोचर दुसर्‍या स्थानावर, एसबीआयच्या अरुंधती भट्टाचार्य चौथ्या, एचपीसीएलच्या निशी वासुदेव पाचव्या आणि ऍक्सिस बँकेच्या शिखा शर्मा दहाव्या स्थानावर आहेत. 

याच यादीत अग्रस्थानावर ऑस्ट्रलियाच्या बँक वेस्टपॅकच्या प्रमुख गेल केली आहेत. एशिया पॅसिफिकच्या २५ शक्तिशाली महिलांच्या यादीत अन्य हिंदुस्थानी महिलांचा देखील समावेश आहे. यात किरण मजुमदार शॉ १९व्या, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सीईओ चित्रा रामकृष्ण २२व्या, एचएसबीसीच्या नैना लाल किदवई २३व्या आणि टैफची अध्यक्ष आणि सीईओ मल्लिका श्रीनिवासन २५व्या स्थानावर आहेत. 

या यादीत भट्टाचार्य आणि वासुदेव या प्रथमच सामील झाल्या आहेत. एसबीआयच्या देशभरात १६ हजार शाखा असून कर्मचार्‍यांची संख्या २ लाख १८ हजार आहे. देशातील या सगळ्यात मोठ्या बँकेची संपत्ती ४०० अब्ज डॉलर आहे. जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत भारतात जन्मलेल्या पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी तिसर्‍या स्थानावर आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.