राखी म्हणते, चहा विकणारा देश चालवू शकतो तर मीही चालवेन

`कंट्रोव्हर्सी क्वीन` राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आलीय... आणि याला कारण ठरलेत ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे... आणि अर्थातच, संधी गमावेल ती राखी कसली...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 24, 2014, 07:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`कंट्रोव्हर्सी क्वीन` राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आलीय... आणि याला कारण ठरलेत ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे... आणि अर्थातच, संधी गमावेल ती राखी कसली...
`आप`चे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी `राखी सावंतही अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकते` असं म्हटलं होतं. यावर जेव्हा राखीला प्रतिक्रिया विचारली गेली... तेव्हा राखीनं, राजकारणही आपण नक्कीच चांगलं काम करू शकतो असं म्हटलं... पण, झालं... हेच बोलताना वाचाळ राखीची जीभ डायरेक्ट मोदींवर घसरली...
`जर चहा विकणारे मोदी पंतप्रधान देश चालवू शकतात... तर, एक आयटम गर्ल का नाही चालवू शकत?` असं म्हणत राखी नरेंद्र मोदींपर्यंत पोहचली.
यावेळी, राखीनं अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. मी `आयटम गर्ल` असेल तर अरविंद केजरीवाल `आयटम बॉय` आहेत, असंही राखीनं म्हटलंय. सोबतच, आपल्याला केजरीवाल यांच्यासोबत `बाबूजी जरा धिरे चलो... बिजली खडी यहाँ बिजली खडी` या गाण्यावर डान्स करायला आवडेल, असंही राखीनं म्हटलंय.
यावेळी, राखीनं उद्धव ठाकरेंनी `राखीही दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचं काम सांभाळू शकते` या वक्तव्याबद्दल त्यांचे आभार मानले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.