नवी दिल्ली : दिल्लीत पोलिसांननी ३४ वर्षीय वकिलाला शूजमध्ये स्पाय कॅमेरा लावून महिलांचे अश्लिल व्हिडिओ बनिवण्याच्या आरोपात अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण दिल्लीतील एक मॉलमध्ये स्पाय कॅमऱ्यातून महिलांचे आपत्तीजनक व्हिडिओ हा वकील काढत होता. हा वकील हरियाणातील राहणारा आहे. दिल्ली पोलिसांनुसार वकील हरियाणा ग्राहक मंचाचे माजी अध्यक्षांचा मुलगा आहे.
एका मॉलमध्ये संशयास्पद रित्या फिरत असताना एका दुकानाच्या मॅनेजरने पकडले. मॅनेजरने चौकशी केली त्यानंतर त्याला जाण्यास सांगितले पण त्यानंतर एका सेक्युरिटी गार्डने संशयास्पद रित्या फिरताना पाहिले. त्यानंतर त्याच्या शूजमध्ये स्पाय कॅमेरा सापडला.
वकीलाने आपल्या डाव्या पायाच्या शूजमध्ये असा कॅमेरा फीट केला होता. त्याद्वारे तो महिलांचा अश्लिल व्हिडिओ शूट करू शकत होता. वकील मॉलमध्ये महिलांच्या मागे मागे फिर होता. पोलिसांनी त्याच्याकडून १२ अश्लिल क्लीप जप्त गेल्या आहे. या क्लिप बनवून त्या इंटरनेटवर विविध साइट्सवर टाकणार होता.
काही साइट्स पाहून त्याला ही आयडीया आली त्यानंतर ऑनलाइन पोर्टलवरून हा स्पाय कॅम खरेदी केला. त्यानंतर तो शूट करायला लागला. पोलिसांनी त्याचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला आहे. चौकशी सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.