मुंबई : तुमच्या जीवनात रोमान्स म्हणजेच काम जीवनाला मोठं महत्व आहे, कामजीवन ही फार मोठी उर्जा देत असते, कामवासनेला योग्य मार्ग मिळाला नाही, तर मन आणि शरीर यांच्यात उलथा पालथ होण्याची शक्यता वाढते.
मनाची एकाग्रता भंग पावते, यातून इतर आजारांना आमंत्रण मिळते, जसे अल्सर, ब्लडप्रेशर, हृदयरोग. मात्र ही उर्जा जी व्यक्ती कोणत्याही चांगल्या कामाकडे वळवू शकते, ती व्यक्ती अत्युच्च पदाला पोहोचते, असं अध्यात्माप्रमाणे म्हणता येईल.
मात्र दुसरीकडून कामसुख मिळवणारा हा बाहेरख्याली ठरतो, हे दोन्ही ज्याला जमत नाही तो नेहमी चिंतेत असतो, तो कुढत बसतो. यात अल्सर, ब्लडप्रेशर, हार्ट अॅटॅक, प्रोस्टेट ग्रंथी वाढणे किंवा मानसिक आजार जडतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.