तुळशीची पाने टाकलेल्या दुधाने सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

हल्ली आपल्याला लहानशी शिंक जरी आली तरी लगेच औषध, गोळी घेतली जाते. याने लगेच आराम पडतो मात्र त्याचे साईडइफेक्टही होतात. मात्र अशा लहान आजारांसाठी औषधे न घेता घरच्या घरीही उपाय करु शकतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला अधिक महत्त्व दिले जायचे. 

Updated: Oct 22, 2016, 12:10 PM IST
 तुळशीची पाने टाकलेल्या दुधाने सेवन आरोग्यासाठी फायदेशीर title=

मुंबई : हल्ली आपल्याला लहानशी शिंक जरी आली तरी लगेच औषध, गोळी घेतली जाते. याने लगेच आराम पडतो मात्र त्याचे साईडइफेक्टही होतात. मात्र अशा लहान आजारांसाठी औषधे न घेता घरच्या घरीही उपाय करु शकतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला अधिक महत्त्व दिले जायचे. 

आयुर्वेदात तुळसला मोठे महत्त्व आहे. तुळशीचा काढा सर्दी, खोकल्यावर फार गुणकारी आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का दुधात तुळशीची पाने टाकून रिकाम्या पोटी हे दूध प्यायल्यास अनेक फायेदही होतात. 

तुळशीच्या पानांमध्ये अनेक अँटीबायोटिक्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचप्रमाणे दुधातही अनेक पोषक तत्वे असतात. यामुळे तुळशीची पाने दुधात टाकून प्यायल्यास रोगप्रतिकारक्षमता वाढते. यामुळे शरीरा अनेक आजारांपासून दूर राहते. 

हल्लीच्या स्पर्धात्मक युगात सतत कोणी ना कोणी डिप्रेशनमध्ये असते. हा तणाव घालवण्यासाठी दुधात तुळशीची पाने टाकून प्यावे. यामुळे नर्व्हस सिस्टीम रिलॅक्स होते. तसेच स्ट्रेस हार्मोन्सना कंट्रोल करते. 

रिकाम्या पोटी तुळशीची पाने घातलेले दूध प्यायल्यास अस्थमासारख्या आजारापासून आराम मिळतो. 

हृदयासंबंधित आजारांमध्येही रिकाम्या पोटी हे दूध पिणे फायदेशीर ठरते.