MCA कडून विनोद कांबळीला सापत्न वागणूक? वानखेडे मैदानातील VIDEO व्हायरल

भारताचा माजी स्टार क्रिकेटपटु विनोद कांबळी, ज्यांचा मुंबई क्रिकेटला वैभव मिळवून देण्यात मोठा वाटा आहे त्यांना पाचव्या सहाव्या रांगेत बसवलं होतं

शिवराज यादव | Updated: Jan 20, 2025, 10:17 PM IST
MCA कडून विनोद कांबळीला सापत्न वागणूक? वानखेडे मैदानातील VIDEO व्हायरल title=

मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा दिमाखदार आणि नेत्रदिपक सोहळा संपन्न झाला आहे. या सोहळ्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पण दुसरीकडे याच सोहळ्यातलं एक विदारक चित्र समोर आलं आहे. 

क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईचं वानखेडे स्टेडिअम म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक. वानखेडेच्या दैदिप्यमान कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. याचा दिमाखदार आणि नेत्रदिपक सोहळा दिग्गज खेळाडुंच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यातील रवी शास्त्री यांच्या कॉमेंट्रीवर नेटकरी जाम खूष झाले. पण दुसरीकडे याच सोहळ्यातलं एक विदारक चित्र समोर आलं होतं. प्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा याच सोहळ्यातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत भारताचा माजी स्टार क्रिकेटपटु विनोद कांबळी, ज्यांचा मुंबई क्रिकेटला वैभव मिळवून देण्यात मोठा वाटा आहे त्यांना पाचव्या सहाव्या रांगेत बसवलं होतं.. प्रकृतीच्या कारणामुळे चर्चेत असलेल्या विनोद कांबळीला सापत्न वागणूक दिल्याचं समोर आलंय. विनोद कांबळी हे सध्या आजारामुळे त्रस्त असले तरी त्यांच्या नावे असलेल्या विक्रमाचा सन्मान विसरला जाऊ शकत नाही.. आणि चाहते तो विसरलेले नाहीत अशी भावना नेटक-यांनी व्यक्त केलीय

मुंबई क्रिकेट असोसिएशनला जरी विनोद कांबळींला आठव्या रांगेत टाकावंसं वाटलं असलं तरी त्यामुळे त्याने मुंबई क्रिकेटला दिलेल्या योगदानाचं महत्त्व कमी होत नाही.

विनोद कांबळींची कारकीर्द - 

1991 मध्ये भारतीय संघात पदार्पण
1993 मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण
1993 मध्ये वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध 224 धावांची खेळी करत द्विशतक
पहिल्या सात सामन्यांमध्ये दोन द्विशतकांसह 793 धावांची नोंद
सर्वात तरुण भारतीय द्विशतकवीर होण्याचा विक्रमक
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावांचा विक्रम

सोहळ्याला उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी एमसीएच्या पदाधिका-यांना विनोद कांबळीला दिलेल्या दुजाभावाच्या वागणुकीबद्दल कल्पना दिली होती. मात्र, तरीही विनोद कांबळीना बसण्याची दिलेली जागा बदलण्यात आली नसल्याचं नेटकरी सांगतायत.

भारतीय खेळाडूंनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अनेक विक्रम नोंदवले आहेत. सचिन, रवी शास्त्री आदी दिग्गजांसोबतच विनोद कांबळीचाही त्यात मोठा वाटा आहे. मात्र एमसीएच्या कार्यक्रमात विनोद कांबळीला मिळालेली वागणूक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली.