Shreyas Iyer on KKR: आयपीएल 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजेतेपद पटाकावलं होतं. पण आश्चर्याची बाब म्हणजे, मेगा लिलावात कोलकाता संघाने श्रेयस अय्यरला रिटेन केलं नाही. याउलट संघाने रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती यांच्यासह हर्षित राणा आणि रमनदीप सिंग यांची निवड करण्यात आली. दुसरीकडे श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26 कोटी 75 लाखांत विकत घेतलं आहे. आयपीएल 2025 मध्ये श्रेयस अय्यर पंजाब संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान नुकतंच श्रेयस अय्यरने एका मुलाखतीत रिटेंशनचा गोंधळ आणि आपण किती निराश झालो होतो यावर भाष्य केलं.
"नक्कीच, कोलकाता संघाकडून चॅम्पियनशिप जिंकलो तेव्हा माझा वेळ खूप छान गेला. तिथे चाहते खूपच जबरदस्त होते, ते स्टेडियममध्ये उत्साही होते आणि मी तिथे घालवलेला प्रत्येक क्षण मला खूप आवडला. त्यामुळे आयपीएल चॅम्पियनशिपनंतर आम्ही लगेचच चर्चा केली होती. पण काही महिन्यांसाठी सर्व काही शांत होतं आणि रिटेन्शन टॉकमध्ये कोणताही ठोस प्रयत्न झाला नाही. काय चालले आहे याबद्दल मी गोंधळलो होतो. त्यामुळे, संवादाच्या अभावामुळे, आम्ही अशा परिस्थितीत आलो की एकमेकांपासून वेगळे झालो. हेत मोठं आणि छोटं कारण आहे," असं श्रेयसने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.
"हो नक्कीच मी नाराज झालो होतो. , कारण जेव्हा तुमच्याकडे संवाद साधण्याची विशिष्ट पद्धत नसते आणि जर तुम्हाला रिटेन्शन डेटच्या एक आठवडा आधी गोष्टी कळल्या, तर तिथे काहीतरी कमतरता आहे हे स्पष्ट आहे. म्हणून मला निर्णय घ्यावा लागला. जे काही लिहिले आहे ते घडणारच आहे. पण त्याशिवाय, मी फक्त एवढेच म्हणू इच्छितो की शाहरुख सर, कुटुंब, त्या सर्वांसोबत मी तिथे घालवलेला वेळ अद्भुत होता. आणि अर्थातच, चॅम्पियनशिप जिंकणे हा कदाचित माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता," असं श्रेयस पुढे म्हणाला.
श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्स संघाचाही भाग होता. त्याने 2018 ते 2020 दरम्यान दिल्ली संघाचंही नेतृत्व केलं.