कँसरचा 'टॉवर'

दूरसंचार मंत्रालयाच्या नव्या संकेतानुसार आता देशभरातल्या सा-याच मोबाईल टॉवरवर आता नियंत्रण येणार आहे. १ सप्टेंबर पासून हा निर्णय लागू होणार आहे. मोबाईल टॉवरमधून निघणारं रेडिएशन हे आता ९० टक्यांनी कमी करण्यात येणार आहे.

Updated: Jul 20, 2012, 12:30 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

दूरसंचार मंत्रालयाच्या नव्या संकेतानुसार आता देशभरातल्या सा-याच मोबाईल टॉवरवर आता नियंत्रण येणार आहे. १ सप्टेंबर पासून हा निर्णय लागू होणार आहे. मोबाईल टॉवरमधून निघणारं रेडिएशन हे आता ९० टक्यांनी कमी करण्यात येणार आहे. आणि एकूणच हा अहवाल समोर आल्यानं प्रत्येक सर्वसामान्याला दिलासा मिळाला असला तरी हा धोका किती गंभीर होता याचं चित्रही स्पष्ट झालंय.

 

जर तुम्हीही मोबाईल टॉवरमधून निघणा-या रेडिएशन आणि त्यातून उदभवणा-या आजारांमुळे जर तुम्ही चिंतीत असाल तर आता मात्र तुमच्यासाठी खुषखबर आहे. मोबाईल टॉवरमधून येणा-या रेडिएशनमुळे होणा-या आजारांपासुन सुटका देण्यासाठी आता १ सप्टेंबर पासून नवा नियम लागू होणार नाही. १ सप्टेंबर पासून  देशभरात मोबाईल टॉवरमधून निघणा-या रेडिएशन सध्याचं असलेला स्तर कमी करुन ९० टक्यांन घटवण्यात येणार आहे. दूरसंचार मंत्रालयाच्या एक नव्य़ा कमीटीने दिलेल्या सूचनानुसार ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भारतात सध्या  रेडिएशन एक्सपोझर लिमिट हे ९.२ व्हॅट प्रति वर्ग मीटर आहे. त्याला नियंत्रित करुन  वजा ९२ व्हॅट प्रति वर्ग मीटर करण्यात येणार आहे

 

जाणकारांच्या म्हणण्यानुसार रे़डिएशन एक्सपोझर लिमीट कमी केल्यामुळे आरोग्यावर विपरीत परीणाम होण्याचा धोका कमी होणार आहे. अस असलं तरी मोबाईल नेटवर्क कंपन्यानी मात्र याला विरोध करण्याचं ठरवलय.. मोबाईल कंपन्याच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रोमॅग्निटिक फिल्ड लिमीट कमी केल्यामुळे लोकांच्या प्रकृतीत लगेचच सुधारणा होणार नसली तरी मोबाईल कंपन्याचे नेटवर्कवर मात्र याचा परीणाम होणार आहे.  मोबाईल कंपन्याच्या म्हणण्य़ानुसार सरकारच्या या निर्णयाचा मोबाईल नेटवर्कवर प्रचंड परीणाम होणार आहे. त्याचप्रमाणं मोबाईल फोनची बॅटरीचा टॉकटाईमही कमी होईल. टेलिकॉम ऑपरेटर कंपन्याच्या दाव्यानुसार मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे आरोग्यावर परिणाम होतोय हा निव्वळ अपप्रचार करण्यात येतोय..

 

आपल्या देशाची रेडिएशन एक्सपोझरची मर्यादा ही रशिया आणि चीनच्या तुलनेत फार प्रचंड आहे. रशिय़ाची रेडीएशन एक्सपोझर लिमीट  उणे व्हॅट प्रती मीटर आहे आणि चीनची ०.४ व्हॅट प्रति मीटर आहे. आणि म्हणूनच भारतातला मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा धोका हा चिंतेचा विषय ठरलाय. कधी काळी खुशीचा आणि आनंदाचा संदेश देणारा मोबाईल वास्तवात मात्र आता आजारी पाडू लागलाय. देशभरातल्य़ा एक करो़ड लोकांवर सध्य़ा जे आजाराचं सावट आहे, त्यातील प्रमुख कारण म्हणजे मोबाईलचे टॉवर.. सरकार पण देशातल्या या मोबाईलच्या वाढत्या टॉवरमुळे चिंतेत पडलय..यामागची नेमकी कारण काय आहेत त्यावर नजर.

 

मोबाईल फोन..शेकडो कोसांच अंतर मिटवणारा ही आजघडीची सर्वांच्या प्राणप्रिय असलेली वस्तू ..केवळ घर दारच नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तुमचा त्या व्यक्तीशी मोबाईलवरुन संपर्क होण आता अवघड राहीलेलं नाही.. पण याच आनंददायी बनलेल्या मोबाईलच्या टॉवरमुळे आता संकटात भर पडतेय. मोबाईल टॉवरच्या रेडीएशनमुळे मानवी आयुष्य अनेक आजारांना निमंत्रण देतंय..

 

 ९० कोटी लोकांच्या आयुष्याचा प्रश्न ?

जर तुम्हीही या ९० करोड लोकांमधील एक मोबाईल वापरणारे असाल तर सावधान... कारण तुमच्या खिशात, कानात, घरात, ऑफिसात, प्रत्येक ठिकाणी मोबाईलच्या रुपानं हा धोका तुमचा पाठलाग करतोय.  जाणकारांच्या म्हणण्यानुसार मोबाईलला सिग्नल देणारे टॉवर हे या संकटाचं खर कारण मानल जातय.  आजारी व्यक्तीच्या भागांचे सर्वेक्षण केल्यास  मोबाईल टॉवरमधुन होणार रेडिएशन हे धोकादायक आहे.. .गेल्या काही दिवसात मोबाईल टॉवर जवळ राहणा-या अनेक लोकांना वेगवेगळ्या आजाराशी सामना करावा लागण्याचे प्रकार वाढलेयत.. आणि म्हणूनच आता सरकारनं मोबाईलच्या टॉवरवर निर्बंध लावण्याचे सरकारनं नक्की केलय..भारतात वाढत असलेल्या मोबाईलच्या वापराचा आणि टॉवरमुळे होणा-या रेडिएशनला पाहता आता सरकारनं मोबाईलच्या रेडिएशनवर क़डक कायदे करण्याचे नक्की केलय..

भारतात १ सप्टेंबरपासून  मोबाईलच्या रेडिएशनचा स्तर ९.२ व्हॅट प्रतिवर्ग मीटरनं कमी होऊन ०.९२ व्हॅट प्रति वर्ग मीटर केल जाईल. .याचाच अर्थ मोबाईलचे रेडीएशन आता जवळजवळ ९० टक्यांन कमी होईल.  रेडिएशन कमी केल्यामुळे त्याचा फायदा आता सुमारे