टीम इंडिया अंडर १९ क्वार्टर फायनलमध्ये?

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या युवा टीमनं स्कॉटलंडचा 5 विकेट्सनी पराभव केला. अतिशय नाट्यमय झालेल्या या लढतीमध्ये भारतानं स्कॉटलंडलसा पराभाची चव चाखायला लावत आपला क्वार्टर फायनलचा प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 17, 2014, 08:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दुबई
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या युवा टीमनं स्कॉटलंडचा 5 विकेट्सनी पराभव केला. अतिशय नाट्यमय झालेल्या या लढतीमध्ये भारतानं स्कॉटलंडलसा पराभाची चव चाखायला लावत आपला क्वार्टर फायनलचा प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.
कुलदीप यादवच्या भेदम मा-या-या जोरावर भारतानं स्कॉटलंडला 88 रन्सवर रोखलं होतं. मात्र, 88 रन्सचा पाठलाग करतांना टीम इंडियाची अवस्था 5 विकेट्स 22 रन्स अशी बिकट झाली होती.
अखेर सर्फराज खाननं नॉटआऊट 45 रन्स देत भारतीय टीमला विजय साकारून दिला. त्यानं आणि दीपक हुडानं 77 रन्सची महत्वपूर्ण भागीदारी केली. आता भारताचा मुकाबला पापुआ न्यू गेनियाशी होणार आहे.
कुलदीप यादवची हॅटट्रिक
अंडर-19 वर्ल्ड कपच्या स्कॉटलंडविरुद्धच्या मॅचमध्ये भारताच्या कुलदीप यादवनं हॅटट्रिक साधली. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. एकोणीसाव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर त्यानं फारारला हुडाकरवी कॅच आऊट केलं.
त्यानंतर सहाव्या बॉलरवर स्टिरलीगंला एलबीडब्यू करत आपली दुसरी विकेट घेतली. एकविसाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलर त्यानं बौमला आऊट करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानं या मॅचमध्ये 28 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या.
पाहा संपूर्ण स्कोअर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.