राकेश ठाकूर, प्रतिनिधी, झी २४ तास
दादरमध्ये ठकसेनांची टोळी... खरं वाटत नाही... या ठकसेनानी मलाही गंडा घातला होता... दादर पूर्व येथील टँक्सी स्टॅडवर हे ठकसेन ड्रायव्हर म्हणून काम करतात.
मला पुण्याला जायचं होतं. मी आणि माझ्या होण्याऱ्या पत्नीसोबत पुण्याला जाण्यासाठी सकाळी ८ वाजता दादरला आलो. तेथून शेअर टॅक्सी पुण्याला जातात. याचा मला अंदाज होता. पण कुठून जातात हे माहित नव्हतं. मी टॅक्सी स्टँडवरील एका ड्रायव्हरला विचारले की मला पुण्याला जायचं आहे. तो ड्रायव्हर मला बोलला हा हम लोकही अॅरेंज करके देते है. मी बोललो ठीक आहे. मी त्याला विचारलं, किती पैसे घेणार..त्याने सांगितलं दोघांचे ७०० होतील.. मी त्याला होकार दिला. त्याने त्याच्या टॅक्सीत बसण्यास सांगितलं. मी विचारलं हि टॅक्सी (इको) जाणार... तो म्हणाला 'नाही... आगे से दूसरा गाडी करके देगा...' मी म्हटलं ठिक आहे. दादर स्टेशनवरून त्या टॅक्सीत बसलो. त्याचबरोबर टॅक्सीत त्याच्यासोबत त्याचा साथीदारही बसला. मला काही कल्पनाच नव्हती की पुढे काय होणार आहे.
टॅक्सी पुढे गेल्यावर मध्येच त्याने थांबवली. मी बोललो क्या हुआ... एकतर मला पुण्याला जायची घाई होती.. त्याने ब्ल्यु नियॉन लाईट लावला आणि बोलला, साहब ये लो ३०० रुपया और १००० का नोट दे दो... माझ्याकडेही १०००च्या पाच नोटा होत्या... मी त्याच्याकडून ३०० घेतले आणि त्याला १०००ची नोट दिली... आणि त्याने दिलेली ३०० रुपयांच्या नोटा मोजण्यास सुरुवात केली. तितक्यात काही कळायच्या आतच त्याने हातचालाखी केली... आणि मला सांगितलं... साहेब ये तो १०० का नोट है... आणि नोट ब्ल्यू लाईटवर पकडली आणि सांगितलं ये देख लो..
मला काही कळलंच नाही..मी गांगरलो..मी त्याला सांगितलं..अरे १००० का नोट दिया..तेव्हा तो दमदाटी करत बोलला..हम क्या झुट बोल रहे क्या...तेव्हा त्याच्या साथीदार गाडीबाहेर आला आणि बोलला साहब हम झुट नही बोलते. आणि दमदाटी केली..मी माझ्या होण्याऱ्या पत्नीसोबत होतो..आणि जाण्याची घाई होती..मी त्याला परत १००० ची नोट दिली..तेथे मला माझी फसवणूक झाल्याचं कळलं होतं..मात्र सक्षम पुरावा नव्हता..पुण्याला जाण्यासाठी दूसरी गाडी पकडली आणि जाण्यास निघालो..
संपूर्ण प्रवासात माझी फसवणूक झाली आहे हे मला सहनच होत नव्हतं..असे हे किती लोकांना फसवत असतील याचा मी अंदाज घेतला..तर कळलं कि एक ड्रायव्हर दिवसाला ४० ते ५० लोकांना असा १००० ते २००० रुपयांचा गंडा घालतात..मला ते अजून सहन झालं नाही..तेव्हा मी ठरवलं कि माझी फसवणूक झाली तरी झाली..पण हे कुठे तरी थांबयला हवं.
मी पुण्याहून दादरला शिवनेरी बसमधून संध्याकाळी ६ वाजता आलो..होण्याऱ्या पत्नीस सांगितलं की तू घरी बोईसरला दादरहून ट्रेन पकडून जा... तिनेही होकार दिला... पण तिच्या चेहऱ्यावरही भीतीची रेष मला दिसत होती... पण काय करणार पोलिसांना तर कळवलं पाहिजेच होतं. मी दादर पूर्व येथील पोलीस चौकीत गेलो आणि झाला प्रकार सांगितला. मी न्युज चॅनेलमध्ये काम करतो याची कल्पना मी त्यांना दिली. त्यांना सांगितलं की इथे असे प्रकार रोज घडतात पण माझ्याकडे काही पुरावा नाही.. तुम्ही याला कुठेतरी आळा घाला..त्यांनीही हा प्रकार ऐकून घेतला..आणि त्यांच्या नोंदवहीत त्यानी याची नोंद केली. तितक्यात मी बाहेर जाणार तोच भारतीय मूळ निवासी असलेले सिंगापूरचे नागरीक गुंटी चंद्रशेखर तिथे आले. त्यांचा सिंगापूरचे नागरीक असलेला पुरावा घेउन आणि पासपोर्ट घेउन... त्यांनीही त्याची कहाणी सांगण्यास सुरूवात केली.
माझ्यासारखाच प्रकार त्यांच्यासोबत घडला होता. मी ही तो प्रकार ऐकून हबकलो. ते ज्येष्ट नागरीक होते. त्यांना २००० हजार रुपयांचा गंडा घातला होता. ते बोलत होते... Money is no matter for me...लेकिन उन्होने मुझे धमकाया.. ये बात ठिक नही..वो हट्टे खट्टे सरदार थे..मै डर गया..हमारे सिंगापूर मे ऐसा नही होता. यहा 'अथिती देवो भव' आप बोलतो हो..और हमे ऐसे लुटतो हो.ये ठिक नही..आप उसे सबक सिखाओ..I recognised them..नही तो मैं मेरी सिंगापूर एम्बेसीको Complain करुंगा..पोलीसच्याही झाला प्रकार हा गंभीर असल्याचे लक्षात आले. त्यानी आम्हाला माटुंगा पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितलं. मी त्यांच्यासोबत माटुंगा पोलिस ठाण्यात गेलो..त्याना झाला प्रकार सांगितला..त्यानी FIR नोंदवून घेतली..आणि माझ्यासोबत ७ सिव्हिल पोलीस पाठवले. मी दादर स्टेशनला आलो. तिथे काही वेळ पाहणी केली.
थोड्या वेळाने मला गंडा घातलेला तो ड्रायव्हर समोरच दिसला..मी पोलिसांना सांगितलं हाच तो..पोलिसांनी सापळा रचल्याप्रमाणे त्याला पकडलं. आणि घेउन माटूंगा पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिथे सिंगापूरचे नागरीक गुंटी चंद्रशेखर होते. ते बोलले मला फसवलेला हा नाही..पण मी बोललो मला फसवलेली व्यक्ती हिच आहे आणि त्याच्यासोबत दूसराही एक होता..तितक्यात चंद्रशेखर पाणी पिण्यासाठी बाहेर जाण्यास निघाले. आपल्या साथीदाराला पकडल्यामुळे ठकसेनाची टोळी पोलिस स्टेशनबाहेर आली होती. त्यांनी त्यातल्या एकाला ओळखळं आणि बोलले..मला फसवलेला त्या ग्रुपमध्ये आहे. त्यालाही पोलिसांनी पकडले. त्याच्याही काही लक्षात आले नाही. आणि मग त्या दोघां ठकसेनानी आमच्या हाता पाया पडण्यास सुरुवात केली. 'साहब एक गलती हो गया माफ कर दो... कम्प्लेंन्ट मत करना प्लीज..हमारे बिबी बच्चे है...' मी सांगितलं..जो ग्राहक आपके गाडी मै बैठते है वो भी तो कुछ है..तितक्यात त्याची पत्नी वैगरे पोलीस स्टेशनमध्ये आली..हाता पाया पडायला लागली की त्यांना सोडा..हे असं करतात हे आम्हाला बिलकुल माहित नव्हतं..आम्ही त्यांना शिक्षा देतो..
चंद्रशेखर म्हणाले... मी पण त्यांना सांगितलं होत ऐसा मत करो..ये ठिक नही..मै भी गिडगिडाया था..लेकिन उन्होने सुना नही..उनके गलती कि सजा उन्हे मिलनी चाहिए..वो दिन ४०-५० लोगोंको फसाते है..वो बिवी बच्चेको भी नही छोडते..दादागिरी करते है..कोई कुछ नही बोलता तो ये मारते भी है ऐसा सुना है..हमने यहा लोगोसे पुछा ये इनका रोज का धंदा है..कल मेरा प्लाईट है सिंगापूर के लिये लेकिन मै इनको सबक सिखाना चाहता हू..हमारे सिंगापूरमें ऐसा नही होता..पोलिसांनी त्या दोघांना अटक केली..त्याच्या साथीदारालाही दुस-या दिवशी अटक करण्यात आली. मला तसा माटूंगा पोलिस ठाण्यातून फोनही आला. त्या चंद्रशेखर गुंटी यांनीही माझे आभार मानले..त्यांना मदत केली म्हणून त्यानी मला दादरला जाण्यास तुम्हाला रात्रीचा धोका आहे असं सांगितलं..त्यांची गँग आहे..तुम्हाला मी बांद्राला सोडतो.. आणि त्यांनी मला बाद्राला सोडले.
मी इतकं लिहलं पण खरं सांगतो हा प्रकार ब-याच जणांसोबत रोज घडतो..प्रत्येकजण घाईत असतो..१०००-२००० रुपयांसाठी काय करायचे..जाउ दे असा विचार लोक करतात..त्याचाच फायदा हे ठकसेन घेतात..लक्षात ठेवा असे प्रकार मुंबईत सर्रास घडतात..एकिकडे मोदी विदेशी पर्यटकांना आकर्षित करताहेत दूसरीकडे या पर्यटकांची अशी फसवणूक होत आहे. 'अतिथी देवो भव' जे काय बोलतात ते असं असतं का? सगळेच लोक वाईट नसतात पण काही निवडक लोकांमुळे आपल्या देशाचं नाव खराब होतं. यासाठी नागरिकांनी सतर्क होत पुढाकार घेतला पाहिजे..राजकिय लोकांनीही बॅनरबाजी करण्याऐवजी लोकांनी बॅनरवरून सूचना दिल्या पाहिजेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.