धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी

घरात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींची खरेदी करा.

Updated: Oct 28, 2016, 08:16 AM IST
धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी title=

मुंबई : घरात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींची खरेदी करा.

मेष - धनत्रयोदशीच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी चांदीची भांडी आणि इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी करणे लाभदायक ठरणार आहे. 

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी कपडे खरेदी करावे. याशिवाय चांदी अथवा तांब्यांची भांडी खरेदी केल्यानेही फायदा होईल.

मिथुन - मिथुन रास असलेल्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दागिने, हिरव्या रंगाचे सामान इत्यादीची खरेदी करणे चांगले.

कर्क - कर्क राशीच्या लोकांनी चांदीचे दागिने, नाणे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करावीत.

सिंह - सिंह राशीच्या लोकांनी तांब्याची भांडी, कपडे आणि सोन्याची खरेदी करावी. 

कन्या - ज्यांची रास कन्या आहे अशा लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी गणेशाची मूर्ती अथवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करावी.

तूळ - तूळ राशीच्या लोकांनी कपडे, ब्युटी प्रॉडक्ट्स, सजावटीचे सामान तसेच चांदीचे नाणे खरेदी केल्यास त्यांच्यासाठी लाभदायक आहे.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि सोन्याच्या नाण्याची खरेदी करावी. यामुळे लक्ष्मीमातेची कृपा कायम राहते. 

धनू - धनू राशीच्या लोकांनी सोन्याचे नाणे, दागिने वा तांब्यांच्या भांड्यांची जरुर खरेदी करावी.

मकर - मकर राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी वाहन, कपडे, चांदीची भांडी खरेदी करणे शुभ आहे.

कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी सौंदर्य प्रसाधने, सोने, फुटवेअर खरेदी करावे.

मीन - मीन राशीच्या लोकांनी या दिवशी सोन्याची नाणी, दागिने, चांदीची नाणी, भांडी अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी केल्यास लाभ होतील.