महिलांनी कबड्डी 'वर्ल्डकप जिंकून दाखवला'

भारतीय महिला कबड्डी टीमने पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये भारतीय महिला टीमने इराणला २५-१९ ने पराभूत करत वर्ल्ड कपच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

Updated: Mar 4, 2012, 08:15 PM IST

www.24taas.com, पाटणा

भारतीय महिला कबड्डी टीमने पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये भारतीय महिला टीमने इराणला २५-१९ ने पराभूत करत वर्ल्ड कपच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

ममता पुजारीच्या कॅप्टन्सीखालील भारतीय टीम या वर्ल्ड कपमध्ये एकाही मॅचमध्ये पराभूत झाली नाही. या वर्ल्ड चॅम्पियन टीममध्ये महाराष्ट्राकडून तीन खेळाडू सहभागी झाल्या होत्या. मुंबईची सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे आणि पुण्याची दिपीका जोसेफ या तीन खेळाडू या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाल्या होत्या.

आजच्या दिवशी भारताने पहिले जपान सोबत सेमीफायनल मॅच खेळली ज्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला ५९-२० ने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

[jwplayer mediaid="59832"]