नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) सहा खेळाडूंवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. डोप चाचणीत दोषी ठरल्याने सहा खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या खेळाडूंना एक वर्षासाठी कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. मनदीप कौर, सिनी जोझ, मेरी टिएना थॉमस, प्रियांका पवार, जौना मुरमु आणि अकुंजी या डोप चाचणीत दोषी ठरल्या. बंदी घातलेल्या स्टिरॉईडचे सेवन त्यांनी केल्याचं या चाचणीतून उघड झालं.
नॅशनल एण्टी डोपिंग एजन्सीच्या मुख्यालयात निर्णय जाहीर करण्यात आला तेंव्हा या खेळाडू उपस्थित नव्हत्या. बंदीच्या विरोधात हे खेळाडू नाडाच्या ऍपिलेट पॅनेलकडे अपील करु शकतात. नाडाच्या निर्णय वाचून अभ्यास केल्यानंतरच याचिके संदर्भात निर्णय घेऊ असं खेळाडूंच्या वकिलांनी सांगितलं. नाडाचे पॅनेल हेड दिनेश दयाळ यांनी ऍथलिट यांनी खेळाडूंनी अजाणतेपणी बंदी घातलेल्या द्रव्यांचे सेवन केल्याने बंदीचा कालावधी कमी केल्याचं सांगितलं. पहिल्यांदा दोषी आढळणाऱ्यांना दोन वर्षांची बंदीला सामोरं जावं लागतं .
अकुंजीने एशियन खेळांमध्ये ४०० मिटर्स अडथळ्यांच्या तसंच ४ /४०० मिटर्स रिले शर्यतीत सूवर्ण पदक पटकावलं होतं. अकुंजीवर ३ जुलै २०१२ पर्यंत बंदी घालण्यात आल्याने तिला २०१२ सालच्या लंडन ऑलिंपीकमध्ये भाग घेता येणार नाही. खेळाडूंच्या वकिलांनी मात्र सहभागी होता येईल असं सांगितलं असलं तरी या क्षेत्रातील तज्ञ त्याबाबतीत फार आशावादी नाहीत.