'विघ्नहर सोसायटी'वर विघ्न

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील विघ्नहर इमारतीचं अनधिकृत बांधकाम करुन फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रत्यक्ष मंजूर आराखड्यापेक्षा २० ते ४० टक्के बांधकाम करण्यात आलंय.

Updated: Dec 8, 2011, 02:58 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई

 

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील विघ्नहर इमारतीचं अनधिकृत बांधकाम करुन फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रत्यक्ष मंजूर आराखड्यापेक्षा २० ते ४० टक्के बांधकाम करण्यात आलंय. कोर्टाच्या या आदेशामुळं बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका बसलाय.

 

नवी मुंबईतील पामबीच रोडवरील विघ्नहर सोसायटीचं २० ते ४० टक्के बांधकाम अनधिकृत आहे. २५ मजल्याच्या या इमारतीच्या आराखड्याला मंजूरी नसतानाही बिल्डरनं महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या इमारतीचं बांधकाम केलं. शिवाय बोगस नकाशे आणि कागदपत्रं दाखवून ग्राहकांना त्याची विक्रीही केली. या प्रकरणी सुनीलकुमार लाहोरी यांनी हायकोर्टात केलेल्या तक्रारीनंतर विघ्नहर बिल्डरचे भागीदारांसह अकराजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

नवी मुंबईत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारतींचं बांधकाम झालय. यातल्या अनेक बिल्डिंग अनियमिपणे बांधण्य़ात आल्यात. विघ्नहर हे हिमनगाचे टोक असून नवी मुंबईतल्या अशा अनेक बेकायदा इमारती आहेत. अशा बेकायदा इमारती उभ्याच राहू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीये.