Mumbai Local Update: डहाणू रोड ते विरारपर्यंत चार रेल्वे रूळ टाकण्यात येत आहेत. हे काम डिसेंबर 2026 पर्यंत होण्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास निगम (MRVC)कडून या प्रकल्पावर काम करण्यात येत आहे. भूसंपादन, स्टेशनची इमारत आणि लहान-मोठे पूल बांधण्याचे काम सुरू आहे. MRVCकडून या प्रकल्पाचे काम 27 टक्के पूर्ण झाले आहे. काही प्रमाणात भूसंपादन झाले आहे.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजक्ट-3 (MUTP) अंतर्गंत 63 किमी लांबीचा विरार-डहाणू कॉरिडोर चौपदरीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 3,578 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. विरार-डहाणून स्थानकादरम्यान दोन रेल्वे रूळ टाकण्यात येत आहेत. या मुळं लोकल ट्रेन आणि एक्स्प्रेस ट्रेन उशिराने धावणार नाहीत. मुंबई-अहमदाबाग रेल्वे मार्ग हा सर्वात जास्त रहदारी असणारा मार्ग आहे. मात्र अनेक वर्षांपासून या 63 किमी लांबीच्या मार्गावर फक्त दोन रेल्वे रूळ उपलब्ध होते. त्यामुळं रेल्वेचा स्पीड खूप कमी होता. याशिवाय उपनगरीय सेवा डहाणू रोडपर्यंत वाढवावी लागणार असल्याने आणखी दोन रूळ टाकावे लागणार आहेत. चार रेल्वे रूळ टाकण्यात आल्यानंतर बोरिवली ते डहाणू दरम्यान अधिक जलद लोकल धावू शकतात. लांब पल्ल्याच्या गाड्या चालवताना वेळेचीही बचत होणार आहे.
या प्रकल्पासाठी एमआरव्हीसीने 29.17 हेक्टर खासगी जमीन आणि 10.26 हेक्टर सरकारी जमीनीचे संपादन केले आहे. यापैकी 3.77 टक्के वन खात्याची जमिनही संपादित करण्यात आली आहे. एमआरव्हीसीने दिलेल्या माहितीनुसार, २६.५१ हेक्टर जमिनीसाठी वनविभागाची मंजुरी आवश्यक असून, त्यावर काम सुरू आहे. त्याची पहिली मंजुरी फेब्रुवारी, 2022 मध्ये प्राप्त झाली आहे आणि 16 जानेवारी 2023 रोजी केंद्र सरकारकडून दुसरी मंजुरी मिळाली आहे.
दोन रेल्वे रूळ टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी खारफुटी तोडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. खारफुटी क्षेत्रात काम करण्यास ठाणे स्थानिक प्रशासनाकडून २१ नोव्हेंबर २०२३ रोजी अंतिम मंजुरी मिळाली आहे. याशिवाय 8 नोव्हेंबर 2023 रोजी न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) तारापूरच्या 12.8 हेक्टर जमिनीवर कारशेड बांधण्यासही मान्यता देण्यात आली आहे. नवीन डेपो एनपीसीआयएलच्या जमिनीवर बांधण्यात येत आहे.
विरार-डहाणू दरम्यान वैतरणा नदीवर आणखी एक रेल्वे पुल तयार केला जात आहे. जवळपास 600 मीटर लांबीच्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन मोठे पुल, 16 मेजर ब्रिज आणि 67 लहान ब्रिज बनवण्यात येत आहेत. यातील 60 पुल आणि रेल अंडर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे.