शेअर बाजाराचं कामकाज शनिवारी आणि रविवारी बंद असतं. शेअर बाजार फक्त सोमवार ते शुक्रवापर्यंत सुरु असतो. पण या आठवड्यात तुम्ही शनिवारीही ट्रेडिंग करु शकणार आहात. उद्या म्हणजेच शनिवारी (20 जानेवारी 2024) शेअर बाजार सुरु असणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ही माहिती दिली आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने 29 डिसेंबर 2023 ला माहिती दिली होती की, शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाज सुरु राहणार आहे. या दिवशी तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने रिकव्हरी साइटवर इंट्राडे (Intraday) स्विच-ओव्हरसाठी हे खास सत्र ठेवलं आहे. उद्या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजमध्ये छोट्या छोट्या दोन सत्रात ट्रेडिंग करु शकता.
इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी शेअर बाजार सुरु असणार आहे. नव्या वर्षात या ट्रेडिंग सेशनच्या माध्यमातून स्टॉक एक्स्चेंज डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटचं ट्रायल केलं जाणार आहे. एखाद्या संकटाच्या स्थितीत कोणत्याही अडचणीविना ट्रेडिंग सुरु राहावं यासाठी हे ट्रायल घेतलं जाणार आहे. मार्केट आणि गुंतवणूकदारांना स्थिरता देणं हा मुख्य हेतू आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 2 विशेष सत्रांचं आयोजन केलं जाणार आहे. पहिलं लाईव्ह सेशन सकाळी 9.15 वाजता सुरु होईल. पहिलं सत्र 45 मिनिटांचं असून, 10 वाजता संपेल. याचं ट्रेडिंग प्रायमरी वेबसाइट असेल. तर दुसरं सत्र 11.30 वाजता सुरु होईल. हे सत्र 1 तासांचं असेल, जे 12.30 वाजता बंद होईल. तसंच प्री क्लोजिंग सत्र दुपारी 12.40 ते 12.50 पर्यंत असणार आहे.
शुक्रवारी तीन दिवसांच्या घसरणीनंतर स्टॉक मार्केटमध्ये उत्साह पाहायला मिळाला. सेन्सेक्स 600 अंकांपेक्षा अधिकने वाढून 71,786.74 वर सुर झाला. तर निफ्टी आद 27,615.20 वर सुरु झाला. बाजार सुरु होताच 183 अंकांनी वाढवला.