मुंबई विमानतळावर आरपीआय, करनी सेना विरुद्ध शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

Updated: Sep 9, 2020, 02:42 PM IST
मुंबई विमानतळावर आरपीआय, करनी सेना विरुद्ध शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने title=

मुंबई : अभिनेत्री कंगना मुंबई विमानतळावर पोहोचली आहे. मुंबईत येण्यापूर्वी अभिनेत्रीची कोरोना टेस्टही झाली आहे. जी नेगेटिव्ह आली आहे. दुसरीकडे मुंबई विमानतळावर कंगनाच्या समर्थनात आरपीआय आणि करनी सेनेचे कार्यकर्ते जमले आहेत. तर शिवसेनेचे कार्यकर्ते कंगनाचा निषेध करण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे आरपीआय, करनी सेना आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले आहेत.

शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबई विमानतळाबाहेर पोहोचले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते काळे झेंडे लावून कंगनाच्या विरोधात घोषणा देत आहेत. यामुळे शिवसेना आणि आरपीआय कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

काही वेळात कंगना बाहेर येईल. कंगनाच्या समर्थनार्थ करनी सेना आणि आरपीआयचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. विमानतळाबाहेर ते कंगनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत.

मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने कंगनाला Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे. तर हिमाचल सरकारने देखील कंगनाला सुरक्षा देण्याचं जाहीर केलं होतं.