मुंबई : पीएनबी नॅशनल बॅंक गैर व्यवहारप्रकरणी आजही मुंबईत १० ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. आज आतापर्यंत २२ कोटी रुपये जप्त करण्यात आलेत आहेत.
आज आतापर्यंत २२ कोटी रुपये जप्त करण्यात आलेत आहेत. आत्तापर्यंत याप्रकरणी एकूण ३९ छापे टाकण्यात आलेत. त्यातून आतापर्यंत जवळपास ५७९० कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. २२ फेब्रुवारी पर्यंत हजर राहण्याचे नीरव मोदी आणि टीमला समन्स बजावण्यात आलाय. तर लवकरच नीरव मोदी आणि टीमची स्थावर मालमत्ता जप्त करणार असल्याची माहिती ईडीचे डायरेक्टर कर्नल सिंह यांनी दिली आहेत.
पीएनबी आणि नीरव मोदीच्या ११५०० कोटी रुपयांचा अपहाराचं केद्र असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या ब्रॅडी हाऊसमधल्या शाखेला सीबीआयनं टाळं ठोकलं आहे. सध्या अटकेत असणाऱ्या गोकूळनाथ शेट्टी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याच शाखेत बसून नीरव मोदीवर पैशांचा पाऊस पाडल्याचं समोर आलं आहे. सध्या गोकूळनाथ शेट्टी आणि त्याचे सहकारी पोलीस कोठीडत आहेत.
११ हजार करोड रुपये PNB घोटाळा प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहे. आतापर्यंत झालेल्या घोटाळ्यात हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं जातंय. देशातील सर्वात चांगल्या बँकेतून ११ हजार करोड रुपयाचा घोटाळा केला. पण या घोटाळ्यातील मास्टरमाईंड नीरव मोदी नसून ही व्यक्ती आहे.
नीरव यांची अमेरिकन पत्नी एमी या 11 हजार करोड रुपयाच्या घोटाळ्यातील मास्टरमाईंड आहे. एवढंच नाही तर नीरव मोदी अमेरिकेत पळून जाण्याचा सर्वात मोठा प्लान तयार करण्यात एमीचा सर्वात मोठा हात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बँकिंग घोटाळ्याला 'हनी ट्रॅप' ने पूर्ण केलं आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही मॉडेलच्या मदतीने बँकेतील उच्च अधिकाऱ्यांना या घोटाळ्यात सहभागी करून घेतलं जात होतं. एवढंच नाही तर मोदीची पत्नी एमीचे बॉलिवूड कनेक्शन असल्याचे देखील म्हटलं जात आहे. या प्रकरणात आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता असं म्हटलं जातंय की हनी ट्रॅप सारख्या ब्रम्हास्त्राचा वापर केला गेला. या प्रकरणातील मास्टर माईंड म्हणून एमीकडे पाहिलं जात आहे. तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर संशयाचे बोट ठेवले आहे. या घोटाळ्याला UPA जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.