Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवर कर्नाक पुलाच्या कामासाठी रेल्वेकडून शनिवारी 25 जानेवारीला रात्री 11.30 पासून रविवारी सकाळी 5.30 वाजेपर्यंत 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं त्याचा परिणाम लोकल सेवेवर होणार आहे. मेन लाइनवर सीएसएमटीहून धीम्या मार्गावर रात्री 10.50 वाजता टिटवाळा लोकल तर जलद मार्गावर 10.47 वाजता कसारा लोकल शेवटची असणार आहे. तर हार्बरवर पनवेलसाठी १०:५८ व गोरेगावसाठी १०:५४ वाजता शेवटची लोकल असणार आहे.
मेगाब्लॉक काळात प्रवाशांना लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळं मनस्ताव सहन करावा लागणार आहे. त्यामुळं शनिवारी रात्री व रविवारी सकाळी प्रवास करण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या आणि मगच प्रवासासाठी बाहेर निघा.
- अप आणि डाउन थिम्या मार्ग-भायखळा ते सीएसएमटी
- अप आणि डाउन हार्बर मार्ग बडाळा रोड आणि सीएसएमटी
- ब्लॉक काळात भायखळा आणि सीएसएमटी आणि वडाळा रोड आणि सीएसएमटी दरम्यान लोकल धावणार नाही.
- डाउन धिम्या मार्गावर टिटवाळा ते सीएसएमटी येथून १०:५० वाजता सुटेल आणि टिटवाळा येथे १२:३३ वाजता पोहोचेल.
- डाउन जलद मार्गावर-कसारा ते सीएसएमटी येथून १०:४७ वाजता सुटेल आणि कसारा येथे १:१२ वाजता पोहोचेल.
- अप धिम्या मार्गावर-कल्याण येथून ९:१६ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे १०:४५ वाजता पोहोचेल.
- अप जलद लाइनवर-कल्याण येथून १०:०२ वाजता सुटेल आणि ११:०४ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल
-सीएसएमटी येथून १०:५८ वाजता सुटेल आणि पनवेल येथे १२:१८ वाजता पोहोचेल.
- सीएसएमटी येथून १०:५४ वाजता सुटेल आणि गोरेगाव येथे ११:४९ वाजता पोहोचेल.
-सीएसएमटी अप मार्गावर-पनवेल येथून ९:३९ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे १०:५८ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी अप मार्गावर बांद्रे टर्मिनस येथून १०:२४ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे १०:५४ वाजता पोहोचेल.
ब्लॉक - २६ जानेवारी रात्री / रविवारी
वेळ - रात्री १२:३० ते ३:३०
अप-डाउन मार्गावर ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांत लोकल शॉर्ट टर्मिनेट होतील.
-कर्जतसाठी डाउन धिम्या मार्गावर सीएसएमटीहून १२:१२ वाजता सुटेल आणि कर्जत येथे २:३३ वाजता पोहोचेल.
-अप धिम्या मार्गावर-सीएसएमटीहूनसाठी डोंबिवली येथून १०:४८ वाजता सुटेल आणि सीएसएमटीहून येथे १२:१० वाजता पोहोचेल.
-पनवेलसाठी डाउन मार्गावर सीएसएमटीहून येथून १२:१३ वाजता सुटेल आणि पनवेल येथे १:३३ वाजता पोहोचेल.
-अप लाइनवर- सीएसएमटीसाठी पनवेल येथून १०:४६ वाजता सुटेल आणि सीएसएमटीहून येथे १२:०५ वाजता पोहोचेल.