Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवर कल्याण-बदलापूरमध्ये तिसऱ्या-चौथ्या मार्गिका तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पावरील आव्हानात्मक टप्प्या पार पडला आहे. मध्य रेल्वेने 2 तास 25 मिनिटांचा ब्लॉक घेऊन 22 गर्डर्स रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि फुट ओव्हर ब्रिज (FOB) साठी लाँच करण्यात आला आहे. सीएसएमटी ते कल्याणपर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रकल्प खूपच फायद्याचा ठरणार आहे.
MRVC नुसार, या प्रकल्पासाठी खासगी जमिनींचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सरकारी जमीन 2.59 हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. तर, वन भूमी 0.25 हेक्टरसाठी मंजुरी देखील मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गंत 53 पुल बनवण्यात येणार आहेत. यातील 51व्या GADसाठी मध्य रेल्वेने मंजुरी देण्यात आली आहे. 46 पुलांसाठी कामदेखील सुरू करण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका पुलाला वाहतुकीसाठी खुलादेखील करण्यात आली आहे. या मार्गावर चिखलोली नावाच्या स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी टेंडरदेखील काढण्यात आले असून स्टेशनची इमारत आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे.
कल्याणच्या पुढे दोनच रेल्वे ट्रॅक आहेत. या रुळांवर लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाड्या चालतात. त्यामुळं दर या कॉरिडोरचा विस्तार झाल्यास लोकलची क्षमता दुप्पट होणार आहे. भविष्यात आणखी लोकल चालवण्याचा पर्याय मिळणार आहे. या कॉरिडॉरवरुन जाणाऱ्या ट्रेनचा वेग आणखी वाढेल. तसंच, चार ट्रॅक असल्याने लांब पल्ल्याच्या ट्रेन आणि मालगाड्यांना डायवर्ट करता येईल. या मार्गावर मुंबईतून येणाऱ्या ट्रेन व्यतिरिक्त दक्षिण भारताकडे जाणाऱ्या व येणाऱ्या ट्रेनलादेखील कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. त्यामुळं भविष्यात आणखी दोन ट्रॅकचा विस्तार केला जाऊ शकतो.
कल्याण-बदलापुर तीसरी-चौथी लाइनसाठी 1510 कोटी रुपयांचा निधी
15 रुट किमीचा डबल लाइन ट्रॅक
53 ब्रिज असून 15 किमीच्या मार्गावर 1 मोठा ब्रिज असेल
05 रोड ओव्हर ब्रिज असेल
डिसेंबर 2026पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता