मुंबई : शिवसेना आमदारांना १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकत्रित ठेवले जाणार आहे. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे स्मृती दिन असून यादिवशी मुंबईत येताना काही दिवस राहण्याच्या तयारीनिशी येण्याचे आमदारांना आदेश देण्यात आले आहेत. यावेळी आमदारांना मुंबईबाहेरील हॉटेलमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता आहे. ५ दिवस मालाडच्या द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवलेल्या आमदारांना काल रात्री घरी जाण्यास परवानगी मिळाली होती.
१७ ते २० दरम्यान राज्यात सत्ता स्थापन होण्याची शक्यता असल्यानं आमदारांना पुन्हा एकत्र ठेवण्याचे शिवसेनेचे नियोजन आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची पहिली बैठक काल हॉटेल ट्रायडेण्ट इथं पार पडली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली आणि आघाडी शिवसेनेसोबत चर्चा पुढे कशी नेणार याकडे सर्वांच्या नजरा आहे. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत.