'काळजी करु नका, मी व्यवस्थित,' रतन टाटांनी Instagram पोस्टमधून दिली माहिती

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. अस्वस्थ असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं.   

शिवराज यादव | Updated: Oct 7, 2024, 01:18 PM IST
'काळजी करु नका, मी व्यवस्थित,' रतन टाटांनी Instagram पोस्टमधून दिली माहिती title=

प्रसिद्ध उद्योजक, टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं वृत्त निराधार आहे. कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रतन टाटा यांना ब्रीच कँडी रूग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल कऱण्यात आल्याचं बोललं जात होतं. पण रतन टाटा यांनी स्वत: इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत आपण बरे असल्याची माहिती दिली आहे.

रतन टाटांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

माझ्या आरोग्यासंबंधी काही अफवा पसरत असल्याची मला कल्पना असून, मला प्रत्येकाला त्यात काही तथ्य नसल्याचं सांगायचं आहे. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे. चिंतेचं कोणतंही कारण नाही. मी एकदम व्यवस्थित असून, लोकांना आणि मीडियाला कोणतीही चुकीची माहिती न पसरवण्याची विनंती करतो असं रतन टाटा यांनी सांगितलं आहे.