India's Got Latent Controversy: इंडियाज गॉट लेटेंट या युट्यूबवरील शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त विधान केले. यानंतर समय रैनासह संपूर्ण शो अडचणीत आला. रणवीर अलाहबादियाचा वादग्रस्त व्हिडिओ खूप व्हायरल झाला. यानंतर या शोमध्ये आलेल्या लोकांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. याप्रकरणात आता राखी सावंतच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.
'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये जज म्हणून आलेल्या राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स पाठवला आहे. राखी सावंतला 27 एप्रिल रोजी हजर राहावे लागेल. राखी सावंतने इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये जज म्हणूनही काम केले आहे. राखी सावंतसोबतचा एपिसोड खूपच व्हायरल झाला. त्याचे छोटे व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. पण आता या व्हिडीओमुळेच तिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांसदर्भात अश्लील विधान केल्यानंतर वाद झाला ज्यामध्ये समय रैनालाही खूप ट्रोल केले जात होते. त्याच्याविरुद्ध तक्रारदेखील दाखल करण्यात आली. त्यानंतर राखीने समयला पाठिंबा दिला. एका व्यक्तीने चूक केली पण मग इतरांना का लक्ष्य केले जात आहे? रणवीरने काहीतरी चुकीचे बोलले आणि मीदेखील मान्य करतो की तो चुकीचा होता. पण फक्त समय रैनालाच का ट्रोल केलं जातंय? ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. आज राखी सावंतचे विधान नोंदवले जाणार आहे.
इंडियाज गॉट लॅटेंटवरील सुरू असलेल्या वादात रणवीर अलाहाबादिया, अपूर्व मुखिजा आणि समय रैना हे आरोपी असून ते महाराष्ट्र सायबर सेलच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी त्यांचे म्हणणे नोंदवले जाणार आहे. हे तिघेही आपला जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर कार्यालयात जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेवर ते सर्वजण येतील आणि त्यांचे जबाब नोंदवतील.
'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल अश्लील टिप्पणी केली. यानतर समय रैनाने शोचे सर्व भाग युट्यूबवरून काढून टाकले होते. सर्वोच्च न्यायालयाने पॉडकास्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत युट्यूब किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर कोणताही कार्यक्रम प्रसारित करण्यास मनाई केली आहे.