दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, बहुतांश मंत्र्यांनी महाराष्ट्र प्रभारी यांच्यासमोर भूमिका मांडली असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची चांगली घडी बसली आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली आहे.
पण सरकार स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आहेत. म्हणून या निवडणुकांच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष बदलू नका.
बाळासाहेब थोरात यांना आता बदलण्याचे औचित्य किंवा कारण दिसत नाही,अनेक मंत्र्यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या समोर ही भूमिका मांडली आहे.
दोन दिवस एच के पाटील हे मुंबईत येऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोण असावा याची चाचपणी करत आहेत. सकाळपासून त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर वैयक्तिक संवाद साधला असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारनंतर प्रभारी काँग्रेस आमदारांशी बोलणार आहेत.