राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांचे निलंबन

 राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

Updated: Sep 21, 2018, 09:49 PM IST

मुंबई : राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. वाहनांना योग्यता प्रमाणपत्रे देताना नियमानुसार काटेकोर तपासणी करण्याचे आदेश दिलेले असतानाही पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, यवतमाळ, पनवेल आणि ठाणे येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील या अधिकाऱ्यांनी वाहनांची काटेकोर तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेय. यात 28 मोटार वाहन निरीक्षक, 9 सहायक मोटार वाहन निरीक्षक आदी 37 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करताना त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेय.