असा विचित्र आजार की माणूस खाऊ लागतो नाणी, एकाने 300 रुपये गिळले, डॉक्टरही हैराण; लक्षणं, उपचार जाणून घ्या!

Schizophrenia: तुम्हाला अशा आजाराबद्दल माहिती आहे का ज्यामध्ये रुग्ण धातूची नाणी खायला लागतो? 

Pravin Dabholkar | Updated: Feb 5, 2025, 06:03 PM IST
असा विचित्र आजार की माणूस खाऊ लागतो नाणी, एकाने 300 रुपये गिळले, डॉक्टरही हैराण; लक्षणं, उपचार जाणून घ्या! title=
स्किझोफ्रेनिया

Schizophrenia: आजकाल कोणाला कोणता आजार जडेल? हे सांगता येत नाही. काही आजार तर इतके दुर्मिळ असतात की रुग्णांचा इलाज करताना डॉक्टर्सही हैराण होतात. रुग्णाची सुरुवाती लक्षणे सर्वसाधारण असल्याने घरच्यांच्याही ही गोष्ट लक्षात येत नाही. पण आजाराने गंभीर वळण घेतल आणि जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला की धावपळ सुरु होते. असाच एक गंभीर आजाराचा प्रकार समोर आलाय. ज्यात आजार जडलेल्या इसमाने चक्क नाणी खायला सुरुवात केली. या इसमाने एक-दोन नव्हे तर तब्बल 33 नाणी खाल्ली आहेत. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

 तुम्हाला अशा आजाराबद्दल माहिती आहे का ज्यामध्ये रुग्ण धातूची नाणी खायला लागतो? नुकतीच घडलेली एक घटना ऐकून तुमच्या पायाखालून जमीन सरकू शकते. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील घुमरविन येथेही असाच एक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. घुमरविन येथील रेनबो हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात एका तरुणाच्या पोटातून 33 नाणी काढण्यात आली आहेत.पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याला 31 जानेवारी रोजी रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर अनेक चाचण्या केल्या. ज्यामध्ये त्या तरुणाच्या पोटात अनेक नाणी असल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्या तरुणाच्या पोटातून 300 रुपये किंमतीची बनावट नाणी बाहेर काढली. हा तरुण स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराने ग्रस्त असून त्याच्या पोटातून काढलेल्या नाण्यांचे वजन 247 ग्रॅम असल्याची माहिती डॉ. अंशुक यांनी दिली. 

रुग्ण कोणत्या आजाराने ग्रस्त?

या आजाराबाबत डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली आहे. हा रुग्ण स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहे आणि त्याला नाणी गिळण्याची सवय आहे. या आजाराने ग्रस्त लोक असामान्य विचार करू लागतात. हा विचार सर्वसामान्य माणसांपेक्षा इतका वेगळा असतो की तो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वागू लागतो. या आजाराच्या रुग्णाला एक प्रकारचा ध्यास असतो. हा ध्यास कोणत्याही प्रकारचा असू शकतो. रोग जाणवण्याची क्षमता देखील कमी होते.

स्किझोफ्रेनियाची लक्षणे

अर्थहीन गोष्टींबद्दल बोलणे, एकटे राहायला आवडणे, गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्षमता कमी होणे, मनःस्थिती वेळोवेळी बदलणे, नैराश्याची लक्षणे दिसणे, शारीरिक हालचाली कमी होणे आणि सुस्ती येणे, अशी लक्षणे रुग्णामध्ये आढळतात. यासोबतच
काहीही खरे नसतानाही गोंधळलेले वाटणे आणि विचित्र भावना येणे, मनःस्थिती आणि परिस्थितीत स्वतःची भूमिका समजून घेण्यास असमर्थता दर्शवणे, जीवनाबद्दल निराश वाटणे अशी लक्षणेही दिसून येतात.

उपचार काय?

स्किझोफ्रेनिया पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण जर वेळेत लक्षणे ओळखता आली तर औषधे आणि वर्तणुकीय थेरपीने तो निश्चितपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. तणावापासून दूर राहून खूप आराम मिळू शकतो. यासाठी कोणतीही अचूक वैद्यकीय चाचणी नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. म्हणून डॉक्टर रुग्णाच्या केस हिस्ट्री, मानसिक स्थिती आणि लक्षणांचे मूल्यांकन करतात आणि नंतर उपचार देतात. योग, ध्यान आणि कुटुंबाचा आधारदेखील या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.