वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव: लग्नात आपल्या प्रेमासाठी वाट्टेल ते गोष्टी करायला अनेक लोकं तयार असतात. त्यातून आता गावागावातही मोठ्या प्रमाणात सर्वात महागडी लग्न केली जातात. त्यातून अशाच एका लग्नाची गंमत यावेळी पाहायला मिळाली आहे. आपल्या नवरीसाठी चक्क नवऱ्यानं हॅलिकॉप्टरमधून (Couple Helicopter Entry) एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे सध्या हा विषय सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु नक्की या कपलनं असं काय केलं की त्यांनी चक्क हॅलिकॉप्टरमधून (Wedding Video) एन्ट्री घेतली यामागील रंजक कारणं ऐकून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लाडक्या पत्नीसाठी यानं फुलांची आरास सजवली आणि चक्क आपल्या प्रेमासाठी हॅलिकॉप्टरवरून एन्ट्री केली. चला तर मग जाणून घेऊया या कपलनं असं केलं तरी काय? (Viral Video of Couple Entry in Helicopter For Wedding in Jalgaon Trending News Marathi)
जळगावात एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळाला. लग्नासाठी सासरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून मुलीसह तिच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा अजब गजब लग्नसोहळा पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच दिला आहे. अमळनेर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलाणी यांचा एकुलत्या एक मुलाचा आशिष यांचा विवाह अहमदनगर (Ahmednagar) येथील प्रसिद्ध उद्योजक संजय चंदानी यांची मुलगी सिमरन हिच्याशी अमळनेर शहरात पार पडत आहे. आशिष हा इंजिनियर आहे तर सिमरन चंदानी ही सुद्धा उच्चशिक्षित असून मुलांच्या शिक्षण पद्धतीवर आधारित असलेल्या एका प्रसिद्ध कंपनीच्या एज्युकेशन ॲपमध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत. एकुलता एक मुलगा असल्याने त्याचा विवाह शाही थाटात व्हावा, असं गोकलानी यांचं स्वप्न होत तसेच मुलगी नसल्याने घरात येणाऱ्या सुनेला सरजु गोकलानी यांनी मुलगी मानलं.
मुलगी असती तर तिचा जसा शाही विवाह केला असता त्याच आनंदात घरात येत असलेल्या सुनबाईला तिच्या गावावरून लग्नाच्या ठिकाणी आणण्यासाठी गोकलानी यांनी चक्क हेलिकॉप्टर ची व्यवस्था केली. लाखो रुपये खर्च करून हेलिकॉप्टर उपलब्ध केले. त्यानुसार त्यांनी सुनबाईला तसेच तिच्या कुटुंबियांना न कळवता आज थेट सुनबाईला लग्नाच्या ठिकाणी अमळनेर येथे आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का दिला. अहमदनगर येथून चक्क हेलिकॉप्टर मध्ये बसून नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांचे अंमळनेर येथे आज आगमन झाले.
ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले. त्या ठिकाणी सिमरनच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर दोघेही जोडपे सुरुवातीला अमळनेर (Ambalner) येथील मंगळ ग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेले या ठिकाणी त्यांनी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर पुष्पृष्टी करत सर्वांचेच लक्ष वेधले. एकुलता एक मुलगा आहे.
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 10, 2023
सिमरन हिला सूनबाई समजून नव्हे तर मुलगी समजून तिचा स्विकार करत असून त्याचाच हा मोठा आनंद साजरा असल्याचे गोकलानी यांनी बोलताना सांगितले.