वाशी खाडीवरील पुल २१ दिवस राहणार बंद

 मुंबईकडून वाशीकडे जाणारी हलकी वाहने जुन्या खाडीपुलावरून आणि जड वाहने ऐरोली मार्गे सोडण्यात येणार आहेत. 

Updated: Jan 21, 2018, 12:18 PM IST
वाशी खाडीवरील पुल २१ दिवस राहणार बंद title=

स्वाती नाईक,झी मीडिया, नवी मुंबई :  दुरुस्तीसाठी वाशी खाडीवरील पुल २३ जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येणार आहे.

यामुळे मुंबई - पुणे वाहतुकीला मोठा फटका बसणार आहे.

हा मार्ग बंद केल्यानं वाहतुकीत काही बदल करण्यात येणार आहेत. वाशीकडून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने नवीन खाडी पुलावरील उत्तर मार्गिकेवरून अर्थात मुंबई - पनवेल मार्गिकेवरुन सोडण्यात येणार आहेत.

तर मुंबईकडून वाशीकडे जाणारी हलकी वाहने जुन्या खाडीपुलावरून आणि जड वाहने ऐरोली मार्गे सोडण्यात येणार आहेत.