UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पदभरती जाहीर, सरकारी नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

UPSC CSE 2025:  यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 22, 2025, 02:03 PM IST
UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पदभरती जाहीर, सरकारी नोकरीसाठी 'असा' करा अर्ज title=
यूपीएससी भरती

UPSC CSE 2025: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हीदेखील चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन यावर्षीचे संपूर्ण नोटिफिकेशन, अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न पाहता येणार आहे. 

मागील वर्षीपर्यंत यूपीएससीकडून फेब्रुवारी महिन्यात सीएसई नोटिफिकेशन जारी केले जायचे. पण यावेळी आयोगाने जानेवारीमध्येच नोटिफिकेशन जारी करत. तसेच अर्ज प्रक्रियादेखील त्याचवेळी सुरू होत आहे. नोटिफिकेशन कधी जारी केली जाईल याबद्दल अद्याप कोणतीही निश्चित माहिती यूपीएससीकडून देण्यात आलेली नाही. असे असले तरी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर  अधिक माहिती आणि अपडेट्स मिळत राहतील. 

गेल्या वर्षी यूपीएससीने सीएसईसाठी एकूण 1056 पदांसाठी आणि भारतीय वन सेवा (आयएफएस) साठी 150 पदांसाठी नोटिफिकेशन जारी केले होते. यावेळी कोणत्या विभागात किती पदांची भरती ही नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी अधिकृत सूचनेची वाट पहावी लागेल. सध्या यूपीएससी सीएसई 2025 ची मुलाखत प्रक्रिया सुरू असून ती एप्रिलमध्ये संपेल.

यूपीएससी सीएसई 2025 ची पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी होणार आहे. पूर्व परीक्षेत कट-ऑफ गुण मिळवणारे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि 22 ऑगस्ट 2025 पासून पुढे पाच दिवस परीक्षा असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

UPSC CSE 2025 साठी असा करा अर्ज 

यूपीएससी सीएसई 2025 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार पुढील  सोप्या स्टेप्स फॉलो करुन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी सर्वप्रथमयूपीएससीची अधिकृत वेबसाइट (upsc.gov.in) वर जा. 
होम पेजवरील “UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५” साठी नोंदणी लिंकवर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुमच्या खात्यात लॉग इन करा. अर्ज काळजीपूर्वक भरा आणि अर्ज शुल्क भरा. सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर 'Submit' बटणावर क्लिक करा आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करा. भविष्यातील वापरासाठी अर्जाची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

UPSC CSE 2025 साठी किती असेल अर्ज शुल्क?

2024 च्या सीएसई नोटिफिकेशननुसार महिला, अनुसूचित जाती, जमाती आणि अपंगत्व असलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. इतर सर्व उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून रोख, नेट बँकिंग व्हिसा, मास्टर, रुपे कार्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे ऑनलाइन भरता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा