परभणी : परभणीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान दोन महिलांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. आज परभणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला संबोधित करण्याठी मुख्यमंत्री पुढे सरसावले असता २ महिलांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. संपुर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी त्यांनी आवाज उठविल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही महिलांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.