Bacchu Kadu : राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही जागांवरुन महायुतीमध्ये मतभेद आहे. तर, तिकडे बारातमतीमध्ये शिवतराे यांनी थेट अजित पवारांनविरोधात दंड थोपटले आहेत. भाजपने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. नवनीत राणा यांच्यासह अनेक जण वेटिंगवर आहेत. अशातच आता बच्चू कडू यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे महायुतीचे टेन्शन वाढणार आहे. बच्चू कडू हे थेट भाजपच्या उमेदवारा विरोधात उमेदवार देणार आहेत.
आमदार बच्चू कडू वाढवणार महायुतीचे टेन्शन वाढवणार आहेत. भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांचा विरोध आहे. बच्चू कडू यांनी जाहीर पणे आपला विरोध दर्शवला आहे.
बच्चू कडू हे थेट भाजपच्या उमेदवाराविरोधातच निवडणुक लढवणार अआहेत. यासाठी बच्चू कडू आपला एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. येत्या 6 एप्रिलला बच्चू कडू यांचा उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजपचा एक मोठा नेता प्रहार मध्ये येणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.
अमरावतीतून भाजपचाच उमेदवार लढेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय. अमरावतीचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे महायुतीतील सगळे घटकपक्ष या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत करतील असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय. त्यामुळे अमरावतीतून नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार की आणखी कोणता दुसरा उमेदवार लढणार? हे यादी जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.
अमरावती लोकसभा उमेदवारीवरून महायुतीची डोकेदुखी वाढलीये. राणा दाम्पत्य उमेदवारीवर दावा करत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. दरम्यान, राणांनी एनडीच्या घटकपक्षातील सर्व विरोधक नवनीत राणांच्या प्रचाराला एकाच मंचावर आणेल असा दावा केला होता. त्यावर अभिजीत अडसूळांनी राणा दाम्पत्याला सुनावताना त्यांची परिस्थिती कभी कभी लगता है अपुनीच भगवान है अशी झालीये असं म्हटलंय..
अमरावतीमधून.. अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केल्यानंतरही मविआत कुरघोड्यांचं राजकारण सुरुच आहे.. मविआकडून या मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचं नाव जाहीर करण्यात आलंय. मात्र महायुतीकडून जर नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचाच उमेदवार असावा असा सूर निर्माण झालाय.. शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मेळावे घेण्यास सुरुवातही केलीये..