Christmas special trains in india: नाताळ आणि नवीन वर्षांत तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लान आखत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. नाताळ व नव वर्षापर्यंत सुट्ट्यांचा काळ असतो. या सुट्ट्यांमध्ये अनेक जण फिरायला जाण्याचा प्लान करतात. पण अशावेळी ट्रेनचे तिकिट कन्फर्म मिळेलच की नाही, याची शक्यता नसते. ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी खूप जुगाड करावे लागतात. या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेने प्रवाशांसाठी 64 स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
01151 विशेष दिनांक 20.12.2024 ते 5.01.2025 पर्यंत दररोज मध्यरात्री 12.20 वाजता मुंबई सीएसएमटीवरुन निघणार आहे तर त्याच दिवशी 13.30 वाजता करमाळाला पोहोचणार आहे. (17 फेऱ्या)
ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्निगिरी, कणकवली, कुडाळ, थिविम येथे थांबा आहे. एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक वातानुकुलित प्रथम श्रेणीसह वातानुकुलित-2 टायर, तीन वातानुकुलित-2 टायर, 11 वातानुकुलित-3 टायर, 2 स्लीपर श्रेणी, 2 सामान्य द्वितीय श्रेणी
01463 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 19.12.2024 ते 09.01.2025 पर्यंत दर गुरुवारी 16.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 22.45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल. (4 फेऱ्या)
01464 स्पेशल कोचुवेली येथून 21.12.2024 ते 11.01.2025 पर्यंत दर शनिवारी 16.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 00.45 वाजता पोहोचेल. (4 फेऱ्या)
ही ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्निगिरी, कणकवली, कुडाळ, थिविम,करमाली, मडगाव जंक्शन, कारवार,गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकल, मुकांबिका रोड, बेंदूर, कुंदापुरा, उडुपी, सूरतकल, थोकूर, मंगलुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्कारा, कायमकुलम आणि कोल्लम येथे थांबेल. यात 2 वातानुकूलित - 2 टियर, सहा वातानुकूलित - 3 टियर, 9 स्लीपर क्लास, 3 जनरल सेकंड क्लास, एक जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन बसवण्यात आली आहे.
01407 विशेष गाडी 25.12.2024 ते 08.1.2025 पर्यंत दर बुधवारी पुण्याहून 05.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.25 वाजता करमाळी येथे पोहोचेल. (३ फेऱ्या)
01408 विशेष गाडी 25.12.2024 ते 08.1.2025 पर्यंत दर बुधवारी करमाळी येथून 22.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता पुण्याला पोहोचेल. (३ फेऱ्या)
ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम येथे थांबेल. यामध्ये एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक वातानुकूलित 2 टियर, 2 वातानुकूलित 3 टियर, 5 स्लीपर क्लास, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आहेत.
ट्रेन क्रमांक 09412 अहमदाबाद - थिविम स्पेशल अहमदाबादहून दर रविवारी आणि बुधवारी १४.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता थिविमला पोहोचेल. ही ट्रेन 8 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 पर्यंत धावणार आहे.
ट्रेन क्रमांक 09411 थिविम-अहमदाबाद स्पेशल थिविम येथून दर सोमवार आणि गुरुवारी 11.40 वाजता सुटेल आणि अहमदाबादला दुसऱ्या दिवशी 08.45 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 9 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत धावणार आहे.
ही गाडी दोन्ही दिशांना आनंद, वडोदरा, भरूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.